
नागपूरमध्ये लागले देवेंद्र फसणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर!
यात काहीही आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नाही….
कारण जेंव्हा हरियाणा निवडणुकीपूर्वी 3 दिवस अगोदर तेथील भाजपचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ता बसलेले होते. त्यावेळी त्यांनी पुढील वक्तव्य केलेले होते की,
छत्तीसगडमे जो हुआ वही यहाँ हरियाणामे होने जा रहा हैं. डरने की कोई बात नही,हमारे पास सारी व्यवस्थाए हैं.हमने सारा इंतेजाम करके रखा हैं. 8 तारीख को जब EVM खुलेगी तब काँग्रेस रोएगी, और कहेगी, की EVM नेही इनको जिताया हैं. “
— नायबसिंग सैनी ( हरियाणाचे मुख्यमंत्री )
आणि आश्चर्य असे की त्यांचे भविष्य 100% अचूक ठरले.
हरियाणात ग्राउंड रूटवर 100% भाजपविरोधी लाट असतांना…..
जेंव्हा 8 तारखेला मतमोजणीवेळी पहिल्या एका तासात काँग्रेस 64 जाग्यावर आघाडी होती आणि भाजप 24 जागेवर आघाडी होती.
जेंव्हा EVM उघडल्या तेंव्हा मात्र भाजपने 60 च्या पुढे आघाडी घेतली. आणि काँग्रेसने 30ने पिछाडी घेतली…..!
ही आघाडी शेवटपर्यंत टिकून पुन्हा हरियाणात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार तेच मुख्यमंत्री केंद्रा प्रमाणे हॅट्ट्रिक केली…..
म्हणजे RSS व भाजपचा हा सुप्त अजेंडा जो सर्वोच्च न्यायालय,मुख्य निवडणूक आयोग, C.A.G., R.B.I., C. B. I., I. T. या सर्व व्यवस्थेला गुलाम करुन EVM च्या सेटिंगद्वारे जनतेच्या मताच्या अधिकाराचे हणन करुन सत्तेवर आपलाच माणूस बसवणे हा सुप्त अजेंडा राबविण्याचे काम भाजपकडून RSS करुन घेत आहे!
ही RSS ची 2025 ची तयारी आहे. ही तयारी ना विरोधी पक्षांना ध्यानी येत, ना ही सर्वसामान्य जनतेला.शेवटी जणूकाही आम्ही सर्वजण मिळून या मनुवाद्याच्या गुलामीचे स्वागत करण्यासाठी स्पर्धा लावलेली आहे.
इकडे महाराष्ट्रात ज्या दिवशी हरियाणात भाजप जिंकल्याची बातमी आली, तेंव्हा याच देवेंद्र फसणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत एक सुतोवाच केले की …..
“आता महाराष्ट्रात सुद्धा हरियाणा पॅटर्नच यशस्वी होईल.
आता जर का,EVM वर सेटिंग केली गेल्यामुळे महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आलाच सोबत मित्रपक्षांना थोडेफार लोणचे जरी मिळाले ( तोंडी लावण्यासाठी ) आणि भाजपचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालाच तर आश्चर्य वाटायला नको…….
कारण हेच पुन्हा म्हणतील की,आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिले म्हणून आम्ही पुन्हा निवडून आलो!
सोबतच मी पुन्हा येईन ही प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण केल्याचे समाधान त्याच्यावर चेहऱ्यावर झळकेल.
म्हणून नागपुरात देवेंद्र फसनवीस यांचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले आहेत.ग्राउंडरूटवर मात्र भाजपविरोधी,मिंधेविरोधी, अजितपवार विरोधी लाट असतांना,एवढेच काय जनताच संभ्रमीत असतांना भाजप कशीकाय पुन्हा निवडून येऊ शकेल…..?
आणि जर असं झालंच…….
तर…….
सर्वसामान्य जनतेला आपल्या मताच्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी, सोबत राजकीय विरोधीपक्ष येवो अथवा ना येवो, एका स्वातंत्र्ययुद्धासारख्या युद्धाची तयारी या RSS च्या वीरोधात तन -मन आणि धनाने त्यागातून संघर्षाची ताबडतोब तयारी करावी लागेल…..
“अन्य कोणताही पर्याय नाही….
आवाहनकर्ता जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…