संजय टेंभूर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत
अ.भा.माळी महासंघ शहर शाखा साकोलीच्या वतीने कुणबी समाज सभागृह साकोली येथे कोजागिरी व स्नेहमिलन सोहळा विविध उपक्रम घेऊन पार पडला.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य अनिल किरणापूरे तर प्रमुख पाहूणे म्हणून अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डाॕ.श्रीकांत भुसारी,ॲड.रविभूषण भुसारी , प्रकाश बनकर ,नरेश नगरकर से.नि.एसटी कर्म.,शामराव लांजेवार ,प्रकाश बनकर ,शिला सावरकर ,रेखा केरझरे मंचावर उपस्थित होते .
यावेळी म.जोतिराव फुले,क्रांतीजोती सावित्रीआई फुले,संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समाजप्रबोधन करण्यात आले.सर्व माळी बांधवांचा परिचय यावेळी करण्यात आला.महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर गीत म्हणण्यात आले.साकोली शहर शाखेचे अध्यक्ष यशवंत उपरीकर यांनी प्रास्तविक केले तर आभार प्रांजल मार्कंड नगरकर हिने मानले.उत्कृष्ट असे संचालन स्मिता पात्रीकर मॕडम यांनी केले.
सल्लागार भोजराम मांदाडे ,संपत मेश्राम ,खुशराम गायधने, माधव चिचमलकर ,हेमराज कळसकर,धनपाल बनकर ,दिपक बनकर,ईश्वर पवनकर,निलकंठ केरझरे,बाबुजी उमाळे,सुभाष मांदाडे ,अंतकला बारस्कर ,वैशाली बनकर ,लक्ष्मीताई मांदाडे,साधना बनकर,मनिषा नगरकर,कल्पना उपरीकर ,माया गोटेफोडे ,निशा बनकर,सविता वाघाडे ,गणेश राऊत सर,लिलाधर गोटेफोडे ,श्रीकांत डोंगरवार ,विजय बागडे,जितेंद्र लांजेवार,कल्पना डोंगरवार ,रोषण कटनकर ,इत्यादी तथा साकोली शहरातील सर्व माळी बांधव उपस्थित होते .