113 बटालियन धानोरा तर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी.

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

         दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जसवीर सिंग कमांडर 113 बटालियन सीआरपीएफ वाहिनीच्या निर्देशानुसार 113 बटालियनच्या अधिकारी व जवानांनी धानोरा येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला.यावेळी 113 बटालियन सीआरपीएफ तर्फे रन फॉर युनिटी व शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

        यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.त्यांनी भारताच्या एक संघासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती देण्यात आली. यावेळी अनिल शर्मा द्वितीय कमांडिंग अधिकारी गुलाबसिंग उपकमांडंट डॉक्टर आदित्य पुरोहित वैद्यकीय अधिकारी आणि जीडी बाबुलाल जाट आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.