कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टेकाडी (को. ख.) महाजन नगर येथे सकाळी पती अमित भोयर व पत्नी दुलेश्वरी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.भांडणातंर्गत राग अनावर आल्याने पतीने पत्नी दुलेश्वरीच्या गळ्यावर चाकु ने वार करून निघृण हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली.
हत्या केल्यावर कन्हान पोस्टे ला स्वत: जाऊन हत्याऱ्या पतीने आत्मसमर्पण केले व सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.सदर हत्या घटनाक्रमामुळे कन्हान परिसरात चांगलीच खळखब उडाली आहे.
प्राप्त माहिती नुसार टेकाडी (को.ख.) महाजन नगर येथील राहिवासी अमित नारायण भोयर वय २८ वर्ष याचा रनाळा कामठी येथील रामकृष्ण देवगडे यांची मुलगी दुलेश्वरी वय २५ वर्ष हिच्या सोबत (दि.५) मार्च २०२२ मध्ये प्रेम विवाह झाला होता.
लग्नाच्या काही महिन्या नंतर दोघांमध्ये भांडणे होत असल्याने दुलेश्वरी माहेरीच जात येत होती.या दोघांना ९ महिन्याची कु.आराध्या नावाची एक छोटीशी मुलगी आहे.दुलेश्वरी ही नवरात्रीच्या पहिलेच सासरी येवुन राहत होती.
आज मंगळवार (दि.३१) ऑक्टोंबरला सकाळी ९ ते ९.३० वाजता दरम्यान दोघेच घरी असताना पती अमित भोयर व पत्नी दुलेश्वरी यांचे भांडण झाल्याने पती अमित भोयर याने रोजच्या भांडणाला कंटाळुन घरात असलेल्या चाकुने स्वयंपाक घरात पत्नीचा गळ्यावर वार करून दुलेश्वरीची निघृण हत्या केली. आणि स्वत: कन्हान पोस्टे ला जाऊन आत्मसमर्पण केले.
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीस स्टेशनचे वरिष्ट पोलीस निरिक्ष क सार्थक नेहेते यांना मिळताच त्यांनी स्टाॅपसह घटना स्थळी पोहचुन मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
घटनेचे गंभीर्य लक्षात घेत नागपुर ग्रामिण अप्पर पोलिस अधिक्षक डॉ संदीप पखाले यांनी घटना स्थळी भेट देऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले.
कन्हान पोलिसांनी मृतक दुलेश्वरीचे वडिल फिर्यादी रामकृष्ण शालिकराम देवगडे वय ५६ वर्ष रा. सुपारे ले-ऑउट रनाळा,कामठी यांचे तक्रारी वरून आरोपी अमित नारायण भोयर वय २८ वर्ष यांचे विरूध्द कलम ३०२, ४९८ (अ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपी पतीला अटक करून घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन वरिष्ट पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.