कमलसिंह यादव

प्रतिनिधी

 

पारशिवनी : – कन्हान पिपरी मध्ये आज छठ महापूजा तीन ठिकाणी कन्हान, पिपरी, आणी सिहोरा महा मार्ग घाटावर साजरी करण्यात आली . कन्हान शहरातील कन्हान पुला जवळ, पिपरी घाट, व सिहोरा महा मार्ग पुला जवळ कन्हान नदीत एकूण ३ घाटांवर श्रद्धा , पूजा आणि भक्तीमय वातावरणात छठपूजा साजरी करण्यात आली . कन्हान पुला जवळ, पिपरी घाट येथील कन्हान नदी घाटावर सुर्यास्त छठ पूजा उत्सवानिमित्त महाकुंभ संपन्न झाला . अद्भूत दृश्य पाहण्यासाठी भाविकांचा महासागर उसळला होता . यावेळी क्षेत्रातिल सामाजीक संगठक , विभिन्न राजकिय नेते उपस्थित होते 

या कन्हान नदी पुला जवळ घाटावर एकूण ७०० ते ८०० पर्यंत छठ मातेच्या बेद्या निमार्ण करण्यात आल्या होत्या . , रुग्णवाहिका , 3 बोटी , पोलीस कानाकोपऱ्यात तैनात होते . दंगा ग्रस्त टिम व जिल्ह चे विभीन्न पोस्टे चे स्टाप सह कन्हान पोलिसनी तिन्ही घाटा वर तैनात करून नजर ठेवण्यात आली आहे . उत्तर भारतिय सभा नागपुर जिल्हा व कन्हान भाजपा उत्तर भारतिय संगठन चे कार्यकर्ते सह अनेक संगठन सामाजिक नेते राजकिय नेते कार्यकर्ते आदी उपस्थित होते . व ठिक ठिकाणी पाणी शोचालय लायटिंग चहा अल्पाहार ची व्यवस्था करण्यात आली होती सर्व मान्यवरांनी हिंदू धर्माला पुढे नेण्यासाठी , बळकट करण्यासाठी , छठ पूजेच्या निमित्ताने देशातील नद्यांची स्वच्छता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधानांना केले . दृश्य देवता भगवान सूर्य आणि छठी मैया यांच्या विशेष उपासनेशी संबंधित हा पवित्र सण . महिलांनी आज अष्टचलगामी सूर्याला अर्ध्य अर्पण करण्यापूर्वी कन्हान नदीत स्नान केले . सनातनी परंपरेत भगवान सूर्य आणि षष्ठी मातेचे व्रत मोठ्या नियमाने व संयमाने पाळले जाते . असे मानले जाते की जो व्यक्ती नियमानुसार हे व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना षष्ठी मायेने पूर्ण होतात . छठ व्रतामध्ये विशेषतः सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा नियम आहे , जो सूर्योदय आणि मावळतीच्या वेळी सौभाग्य आणि आरोग्याचे वरदान देतो . माता आपल्या पतीच्या कल्याणासाठी , घराच्या सुख – समृद्धीसाठी 36 तास निर्जल उपवास करतात . यामध्ये पुर्वी सूर्यास्त नंतर सकाळी सुर्योदय दोन्ही वेळी सूर्यदेवाची पूजा केली जाते .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com