लाखेवाडी येथील जे.बी.व्ही.पी.तील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेतील यश कायम…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

              जुदो हा लोकांना शारीरिक मानसिक व नैतिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी तयार केलेली कला नसून मार्शल आर्टमधील एक प्रकार असून हा खेळ ताकदीच्या जोरावर अवलंबून असतो हीच स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा शहा सांस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या.

          सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवून सहभागी झाले होते.यामध्ये विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील 14 वर्ष, 17 वर्ष व 19 वयोगटातील मुले व मुली यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.

        14 वर्ष वयोगट मुली

1.ज्ञानेश्वरी येथे 36 किलो द्वितीय क्रमांक

2.पलक काळे ३२ किलो तृतीय क्रमांक 

         17 वर्ष वयोगट मुली

1.काजल प्रसाद 36 किलो तृतीय क्रमांक

2. सोनिया माने, ७० किलो प्रथम क्रमांक

3.सानिका नितीन माने 48 किलो तृतीय क्रमांक

         17 वर्ष वयोगट मुले

 1.मयूर गायकवाड ९० किलो प्रथम क्रमांक

         19 वर्ष वयोगट मुली

1.श्रेया मुडके 63 किलो प्रथम क्रमांक

2.प्रिया वाघमोडे 70 किलो द्वितीय क्रमांक 

3.क्षितिजा शिंदे 44 किलो तृतीय क्रमांक

         वरील प्रथम क्रमांक चार खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले ,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर सर व तसेच यांना मार्गदर्शन करणारे शिवराज तलवारे अविनाश कोकाटे ,स्नेहल धायगुडे ,अश्विनी शिंदे ,प्रियांका गोलांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यांचेही संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.