उद्या साकोलीत पत्रकार सन्मान व व्याख्यान… — वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था साकोली यांचे आयोजन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

 साकोली : वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था साकोली वतीने उद्या रविवार ०१ सप्टे. ला दु. ०४ वाजता नवजीवन विद्यालय नागझिरा रोड साकोली येथे “पत्रकार सन्मान सोहळा व व्याख्यान” आयोजन करण्यात आले आहे.

           सदर कार्यक्रमाला साकोली, लाखनी व लाखांदूर येथील पत्रकार बंधू व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. येथे वरीष्ठ पत्रकार, वक्ते व वैचारिक लेखक डॉ. उदय निरगुडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून “महाराष्ट्र माझा” या विषयावर व्याख्यान करणार आहेत.

            आपल्या मातृभूमीचा इतिहास व महाराष्ट्रातील संस्कृतींची जाणिव व्हावी व मायबोली मराठी या भाषेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा स्तुत्य उपक्रम येथील वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या आयोजनात होणार आहे.

            सदर कार्यक्रमाला अध्यक्ष मुख्याध्यापक के. डी. लांजेवार, प्रमुख अतिथी गोविंद महाविद्यालय पालांदूरचे उपप्राचार्य माधवराव नवखरे हे मंचावर मार्गदर्शक असतील. या “महाराष्ट्र माझा” विशेष व्याख्यान सत्र आणि पत्रकार सन्मान सोहळ्याला जास्तीत जास्त प्रसारमाध्यमांतील पत्रकार व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था साकोली द्वारा केलेले आहे.