प्रितम जनबंधु
संपादक
प्रगती वन कामगार सहकारी संस्था नरचुली र.नं. 272 या संस्थेची वार्षिक साधारण सभा दी 31/8/2024 रोजी मौजा नरचुली येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर संस्थेला दरवर्षी शासनाकडून 10% अनुदान मिळतो. व त्या अनुदानातून सभासदाना जीवनापयोगी साहित्याच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात येते. पण प्राप्त माहितीनुसार प्रगती वन कामगार सहकारी संस्था नरचुली यांनी गेल्या 2 वर्षांपासून अनुदान साहित्य रुपात वाटप करण्यात आलेला नाही. याबाबत वरीष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. याकरिता वार्षिक साधारण सभेला उपस्थित असलेल्या संस्थेच्या सर्व सभासदानी वार्षिक साधारण सभेवर एकमताने बहिष्कार केला असुन संस्थेच्या कामकाजावर दोषारोपण केला असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
वार्षिक साधारण सभेला विषेश पाहुणे म्हणून जिल्हा संघाचे अध्यक्ष हरिरामजी वरखडे, जिल्हा संघाचे सचिव झाडे साहेब, जिल्हा संघ संचालक उसेंडी साहेब, प्रगती वन कामगार संस्था नचुली चे सचिव हलामी साहेब, विजय धारने संस्था अध्यक्ष नरचुली, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेवर बहिष्कार टाकतांना सभासद हरिदास मडावी, संस्थेचे माजी अध्यक्ष पांडुरंग मडावी तसेच संस्थेचे इतर 178 सभासद उपस्थित होते.