
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर –
चिमूर क्रांती क्रिडा व सांस्कृतीक समिती चिमूर व्दारा आयोजीत,”श्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्य,शहरातील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात ४ सप्टेंबर बुधवारला दुपारी ४.३० वाजता भव्य दहीहंडी उत्सव व स्पर्धा आयोजीत केली आहे.
या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे विरोधी पक्ष नेता नामदार विजय वडेट्टीवार असणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्धघाटक गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान असणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिश वारजूकर,महासचिव प्रदेश महाराष्ट्र युवक काँग्रेस शिवाणी वडेट्टीवार,प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी ( ओबीसी ) धनराज मुंगले,माजी जि.प.सदस्य गजानन बुटके,अध्यक्ष चिमूर तालूका काँग्रेस डॉ.विजय गावंडे,प्रदेश महासचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस साहीश वारजूकर आदी उपस्थित राहणार आहे.
या दहीहंडी स्पर्धेचे १ लाख रुपये रोख प्रथम पारितोषीक कमलाबाई नामदेव वडेट्टीवार यांचेकडून,व्दितीय पारितोषीक ५१ हजार एक रुपये रोख,तृतीय पारितोषीक २१ हजार एक रुपये रोख धनराज मुंगले यांचेकडून विजेत्या संघास देण्यात येणार आहे.
या दहीहंडी उत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक संदीप कावरे,गौतम पाटील,नागेंद्र चट्टे,अक्षय नागरीकर,इशांत मामीडवार,रोहन नन्नावरे,सारंग मामीडवार,अमित सातपुते,सुभाष मोहीनकर व समस्त मित्र परिवार यांनी केले आहे.