योगबार मध्ये,धारदार शस्त्रासह दरोडा टाकणा-या टोळीला कन्हान डि.बी.पथकाने कळमना नागपूर मधून केले गजाआड… — विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-कन्हान हद्दीतील काद्री मधील योगबार मध्ये शुक्रवार 30 आगष्टच्या रात्री 09.00 वाजे दरम्यान फिर्यादी दिनदयाल रामदास बावनकुळे वय 50 वर्ष रा. निलज खंडाळा कन्हान हे काउंटरवर हजर होते.

    अचानक 5 अज्ञात इसमापैकी 3 इसमाच्या हातात चाकु व एकाच्या हातात लाकडी डंडा होता. 

      त्यांनी बार मध्ये येवून काउन्टरवर डंड्याने व चाकुन मारून,ठेवलेले ग्लासचे ट्रे फोडून नुकशान केले. बारमालकाच्या खिशातील 1000/रू बळजबरीने हिसकावून घेतले.

      तसेच बारमधील रॉयल स्टॉगचे 3 पाईट प्रत्येकी 520/रु प्रमाणे एकुण 1560/रू व मॅजीक मोमेन्टची निप कि. 280/रू जबरीने घेतले आणि बारमध्ये तोडफोड करून पिण्याचे पाण्याचे 12 काचेचे ग्लास कि. 276/रू व शोकेशचा फायबर सिट फोडले कि. 15000/रू अशा एकूण 15276/रू थे नुकशान केले. 

        बारमधून निघतानी चाकु व दंड्याचा धाक दाखवून जिवाने मारण्याची,पाहून घेण्याची धमकी दिली.

        फिर्यादी दिनदयाल रामदास बावनकुळे वय 50 वर्ष रा.निलज खंडाळाच्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. कन्हान अपराध क्रमांक. 514/24 कलम 309 (4), 324 (4) (5). 351 (1)(2),3(5) भारतीय न्याय संहीता सहकलम 4,25 भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 

        या गुन्ह्यातंर्गत तपासात 5 आरोपी निष्पण झाल्याने कलम 310 (1) भा.न्या.स. ही कलमवाढ करण्यात आली.गुन्हा नोंद होताच ठाणेदार राजेद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून तपास स.पो.नी.राहूल चव्हान यांचे डि.बी पथकाला मार्गदर्शन केले.

           उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थिती जाणून घेतली व पोलीस अधिक्षक नागपूर (ग्रामीण)यांना घटनेची माहीती देवून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोदार यांच्या आदेशाप्रमाणे तत्काळ दरोड्याचे गार्भीय लक्षात घेवून कन्हान पोलीसाना मार्गदर्शन केले. 

       घटनास्थळा वरील सि.सि.टि.व्ही फुटेज मध्ये सर्व घटनाक्रम स्पष्ट चित्रीत झाल्याने डि.बी.पथकाला गुन्ह्यात 5 आरोपी असल्याची खात्री झाली.

       त्यानुसार आरोपीचे फुटेज पाहून नागपूर परीसरात वेगवेगळ्या टिमव्दारे आरोपींची ओळख पटविताना आरोपी हे कळमना नागपूर येथील असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली. 

       त्यानुसार कळमना नागपूर येथून आरोपीचा शोध घेतला असता तांत्रीक पध्दतीने व गुप्त बातमीच्या आधारे त्याचे ठिकाण शोधून चपळाईने नशेतधुर्त असलेल्या चारही आरोपींना चपळाईने धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले.

        गुन्ह्यातील पाचवा आरोपीबाबत विश्वासात घेवून विचारपूस केली असता पाचवा आरोपी निष्पण झाला.त्यामुळे सदर गुह्यात कलम 310 (1) भा.न्या.स. ही कलमवाढ करण्यात आली.

           गुन्ह्याची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार व अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ,यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांचे सह व.पो.नी. राजेद्र पाटील,सपोनी राहूल चव्हान,पोहवा हरीश सोनभद्रे, पोहवा नरेश श्रवणकर,पोना अमोल नांगरे,पोना महेश बिसने पोना शैलेश वराडे पोशि अश्विन गजभिये,पोशि आकाश शिरसाट,पो.शि.सुशील तेलग,चालक पोहवा अजय भगत यांनी कार्यवाही यशस्वी रित्या पार पाडली.