
जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज भारत
चंद्रपुर : सिंदेवाही
संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना, कैंसर सर्टिफिकेट हेंडीक्याप सर्टिफिकेट तसेच कसल्याप्रकारचे कोणत्याही योजनेचा लाभ व सर्टिफिकेट घेण्याकरिता कोणत्याही व्यक्तीस एक रुपया देऊ नका असे आवाहन नगरपंचायत उपाध्यक्ष मयूर सुचक यांनी केले आहे.
सध्या शहरात दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.हे दलाल गोर गरीब जनतेच्या असाहयतेचा फायदा घेऊन योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून पैसे वसूल करत असल्याची बाब मयूर सूचक यांना समजली प्रत्यक्षात या योजनाचा लाभ घेण्यासाठी नेमून दिलेल्या अटी ची पूर्तता करणे गरजेचे असून या करिता एक रूपयाही खर्च येत नसल्याने मयूर सूचक यांनी सांगितले असून अश्या दलाल लोकांच्या भूलथापाना बळी पडू नका व कोणताही आर्थिक व्यवहार करू नये असे आव्हान नगरपंचायत सिंदवाही लोनवाही चे उपाध्यक्ष मयूर सूचक यांनी केले आहे.