नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जोर दिसतोय. ते सध्या पक्षात काही अंतर्गत बदल करत आहेत.
आज शासकीय विश्रामगृह साकोली येथे पार पडलेल्या सभेत महेश पोगळे यांची वाहतूक सेना साकोली तालुका अध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम यांनी निवड केली.या निवडीनंतर वाहतूक सेनेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.