चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

भंडारा (साकोली):- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना अंतर्गत तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा दिनांक 29/08/2022 रोजी लहरी बाबा मठ हॉल साकोली येथे आयोजित करण्यात आली सदर कार्यशाळेस उदघाटक मा. मदनभाऊ रामटेके समाजकल्याण सभापती जि. प. भंडारा अध्यक्ष मा. गणेशजी आदे ,सभापती पंचायत समिती साकोली ,वरठेजी जी प सदस्य ,वनिता डोये जि प सदस्य, शितल राऊत जि प सदस्य, कोयडवार प.स. साकोली, श्री. गणवीर प.स. साकोली,खर्डेकर मॅडम प.स. साकोली, वालदे मॅडम प.स. साकोली, पवन शेंडे अध्यक्ष सरपंच संघटना, सर्व सरपंच श्री. सागर ढवळे तालुका कृषी अधिकारी, साकोली तसेच तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. भवदिप शहरे यांनी योजने विषयी सविस्तर माहिती दिली तसेच श्री. गौरव कुंभलकर फील्ड ऑफिसर sbi साकोली यांनी लोन प्रोसेस बाबद माहिती दिली.श्री.ढवळे यांनी ३५ टक्के अनुदानित सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्वयन योजनेचा नवीन अथवा जुन्या उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कू.रजनीगंधा टेंभुरकर यांनी केले. सदर कार्यक्रमास अर्ज केलेले.अर्ज करण्यास इच्छुक, बँक मधून रेजेक्ट झालेले लाभार्थी, तसेच शेतकरी बांधव, उमेद गटातील महिला, माविम मधील महिला लाभार्थी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com