नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -सध्या पावसाळा सुरू असल्याने अगोदरच अत्यंत बहिणावस्था असलेल्या व खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या साकोली तालुक्यातील अनेक रस्त्यांची भयानक स्थिती झालेली आहे. त्यात तालुक्यातील उमरी परसोडी सौंदड अवस्था अतिशय दयनीय असून या रस्त्याने वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीची नितांत आवश्यकता आहे. संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
साकोली वरून शेंद्रा का मार्गे दक्षिणेला उमरी परसोडी सौंदड हा मार्ग जातो.या मार्गावरील लवारी उमरी पवार टोली परसोडी सुंदरी व बाजूला चारगाव अशी भारी वस्तीची गावे आहेत.व हा मार्ग सरळ सौंदडला निघतो.त्यामुळे या रस्त्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक दिवसभर सुरू असते.शिवाय या भागात जवळपास सहा राईस मिल आहेत, सिमेंट ब्रिक्स व विटभट्या मोठ्या प्रमाणात आहेत.शिवाय चुलबंद नदीतील परसोडी व उमरी असे मोठे रेती घाट आहेत.एकुणच उद्योगधंद्यांच्या व शेतीच्या दृष्टीने हा भाग अतिशय
वर्दळीचा आहे.कारण याच मार्गाने राईस मिलामध्ये पिसाईसाठी धानाची वाहतूक तसेच मिलामधुन तांदळाची वाहतूक करणारे वाहन चालतात.
म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ता लवकर दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावे.