ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी-

येथील संकटमोचन हनुमान मंदिर शास्त्रीनगरच्या वतीने तान्हा पोळ्या निमित्त नंदिसजावट व नंदीबैल स्पर्धा हनुमान मंदिराजवळ घेण्यात आली.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन उईके ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून न. प.चे आरोग्य सभापती भारत बावनथडे,डॉ. राम राऊत, पत्रकार रुपेश गजपुरे, गोपीचंद नखाते,विजय पत्रे, श्रीकांत शेंडे,मिथुन आडे,प्रफुल निंबेकार,अतुल मने, सचिन हेडाऊ, दीपक खोब्रागडे,चंद्रभान निंबेकर, रमेश घोनमोडे, नंदूजी साळवे, बाळकृष्ण सेलोटे, बाळकृष्ण जंजाळकर, नितीन गडपायले, तानाजी चिलबुले, भास्कर बाळबुदे ,रामदास बोरुले, मुरलीधर धात्रक ,प्रफुल ठवकर, ऋषीजी गाडगोने, अशोक आंबटवार, सुधाकर दोडके, मधुकर धंदरे ,संजय शेंडे, गजानन पडगिलवार, एकनाथ खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नंदिसजावट व वेषभूषा स्पर्धेत एकूण १३४ स्पर्धकांनी भाग घेतला.वेशभूषा स्पर्धेत युक्ती सोरते हिने कालीमातेची वेषभूषा करून प्रथम क्रमांक पटकाविला. तिला मान्यवरांच्या हस्ते १५०१/-रुपये रोख व शिल्ड देऊन गौरव करण्यात आला. हितार्थ ठाकरे व माही धात्रक यांनी शंकर- पार्वतीची वेषभूषा करून द्वितीय क्रमांक पटकाविला. यांना मान्यवरांच्या हस्ते १००१/-रुपये रोख व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.तर स्नेहदीप कापकर याने जोगवा ही वेषभूषा केल्याने त्याने तृतीय क्रमांक पटकाविला. त्याला मान्यवरांच्या हस्ते ७०१/-रुपये रोख व शील्ड देण्यात आली. तर प्रोत्साहनपर, बक्षीस तनुश्री जीभकाटे व रोहन जीभकाटे, अन्वी निंबेकार व अक्षरा निंबेकार यांना देण्यात आला. तर नंदीबैल सजावट स्पर्धेत प्रथम पुरस्कार जानवी सपाटे (२२२२/-रुपये व शिल्ड),द्वितीय पुरस्कार अंश दुधे(१५०१/-रुपये रोख व शिल्ड)तर तृतीय पुरस्कार तनुश्री जीभ काटे(११११/-रुपये रोख व शिल्ड) यांनी पटकाविला. तर प्रोत्साहन पर बक्षीस श्रीकांत शेंडे व अथर्व कापकर यांनी पटकाविला त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी ५००/-रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. नंदिसजावट व वेषभूषा स्पर्धेला परीक्षक म्हणून सौ.अश्विनी गजपुरे व प्रियंका मैंद ह्या होत्या. बालकांनी विविध वेषभूषा सादर करून व नंदिसजावट करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मूला-मुलींना शालेपयोगी शैक्षणिक साहित्य को. आप. बँकेचे विकास अधिकारी नंदू नाकतोडे यांचेकडून मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक आरोग्य सभापती भारत बावनथडे,संचालन नंदू नाकतोडे तर आभार अमोल खेडकर यांनी मानले.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद जंजाळकर सतीश चिलबुले, शैलेश कावळे, छोटू गाडगुणे, अमित राठोड, टिंकू बोडे, त्रिलोक निंबेकर ,अमोल खेडकर, संजय सोनटक्के, कैलास खोब्रागडे ,सचिन हेडाऊ ,गोलू ठेंगरी, उत्सव आंबटवार, अमित जवंजाळकर ,सोहम पत्रे, गगन आंबटवार, हितेश हटवार, लोकेश मेश्राम ,साहिल चिलबुले, पंकज चिलबुले ,मिथुन जवंजाळकर, विकास निंबेकर, मोहन चीलबुले यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता आरतीने करण्यात आली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com