नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -आज दिनांक ३०/८/ २०२२ मंगळवारला शासकीय विश्रामगृह साकोली येथे प्रमोद भाऊ मेश्राम जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये तालुक्यातील सर्व शाखा अध्यक्ष, जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष ,पंचायत समिती सर्कल अध्यक्ष ,व वाहतूक सेना तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या सभेत महेश पोगळे यांची वाहतूक सेना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर तालुका उपाध्यक्षपदी जितेंद्र उईके, कृष्णकुमार कापगते ,अनिल डोमळे, विश्वनाथ चांदेवार यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून राधेश्याम राऊत ,सलमान सलीम खान ,मुस्कान राऊत, सुकराम लांजेवार, राजु देशमुख, गजेंद्र लाडे ,चंद्रशेखर गजापूरे, विलास वडीकार ,दुधराम उईके, सुधाकर हटवार ,प्रदीप मेश्राम, संतोष पुराम, विशाल जनबंधु, जयप्रकाश खोटेले, महेश तरोणे, मिलिंद खोटेले,विजय पगाडे, शुभम मोहोड,भोजराम मडावी राजू देशमुख लोकेश वंजारी यांची निवड करण्यात आली या सर्वांना जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम यांनी नियुक्त पत्र देऊन सत्कार करण्यात आला.