नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : साकोली मधील फ़्रिडम युथ फॉउंडेशन महिला व लहान मुलांसाठी नेहमीच वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन येते. तसचं गणेश चतुर्थी व नवरात्री साठी मुलांमधील कला हे संस्कृती कार्यक्रम मध्ये दाखवली जाते. यामध्ये महिला व लहान मुले या मध्ये सहभाग घेत असतात. त्याच्या कलेला वावं मिळावा. यासाठी गरबा दांडिया यांचे प्रशिक्षण केंद्र कुणबी समाज सभागृहात ठेवण्यात आले. यामध्ये वयाची अट न राहता कुणीही या मध्ये सहभाग घेऊन आपली नावे नोंदणी करू शकतात. खास प्रशिक्षण साठी खास वर्ग पाडलेले आहेत. त्यासाठी वेगळी फ्री नोंदणी करावी लागणार आहे. जे अतिशय गरीब घरचे मुलेमुली आहेत. त्यांना गरबा दांडिया करण्याची खुप इच्छा आहे पण फी भरू शकत नाही त्यांच्यासाठी फ्रिडम युथ फॉउंडेशन कडून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या प्रसंगी तिथे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अमोल हलमारे, दिपक (सोनू )थानठराटे, ऍड. मनिष कापगते,आशिष गुप्ता, दिपक हिवरे, हेमंत चांदेकर, फ्रिडम अध्यक्ष किशोर बावणे ,सदस्य कार्तिक लांजेवार, नील गुप्ता,प्रीतम मेश्राम,अलफेज खान,मोहित कराडे, अनिकेत काणेकर, पंकज टेकाम, स्वामी नेवारे, हितेश शहारे, कार्तिक चौबे, कमलेश येवले, सुधीर मस्के, रोशनी गुप्ता, हलमारे मॅडम, प्रांजली शहारे, हेमलता गिरीपुंजे, स्वपना पाटणकर कार्यक्रमाला उपस्थिती होते.