नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली -दि.२९ आॅगस्ट २०२२ रोजी साकोली तालुका काँग्रेस कमिटीद्वारे तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भात शेती शेतकरी करतात त्यामध्ये भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जातात. यावर्षी अतिवृष्टी झाल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले त्याकरिता शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, मार्केटिंग फेडरेशन द्वारा संचालित धान खरेदी केंद्राची तारीख वाढवून खरेदीची वाढीव मुदत देण्यात यावी ,खरेदी केलेल्या धान्याचे पैसे त्वरित द्यावे, धान खरेदी केंद्राचे धान खरेदी उद्दिष्टे क्षमता वाढवून देण्यात यावी असे या निवेदनात नमूद केले आहे.

निवेदन देतेवेळी होमराज कापगते अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, मदन रामटेके जिल्हा परिषद सभापती ,अश्विन नशिने साकोली शहर अध्यक्ष ,उमेश कठाणे जिल्हा सचिव ,छायाताई पटले महिला अध्यक्ष साकोली ,गणेश आदे पंचायत समिती सभापती, हरगोविंद भेंडारकर तालुका सचिव काँग्रेस कमिटी, नारायण वरठे, नेहा रंगारी ,जितेंद्र शहारे, सुधाकर चांदेवार, दिलीप वासनिक , नागेश्वर येळे, प्रदीप परमार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com