ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी-

 सरपणासाठी काडया आणण्याकरीता जंगलात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून त्याच्या नरडीचा घोट घेऊन ठार मारल्याची घटना दिनांक 29 ऑगस्टला सकाळी ८ वाजताच्या सुमारास जोगीसाखरा येथील जंगलातील कक्ष क्र . ४७ मध्ये घडली . वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या शेतकऱ्याचे नाव बळीराम शिवराम कोलते 55 वर्ष रा. सालमारा असे आहे .  आरमोरी तालुक्यातील शंकरनगर व सालमारा जंगल परिसरातील घटना …

प्राप्त माहतीनुसार आज सकाळी ७.३० बाजताच्या सुमारास सरपणासाठी काड्या आणण्याकरीता बळीराम हा सालमारा येथून पायवाटेने शंकर नगर येथील जंगलात गेला होता . काड्या तोडीत असताना झुडपात दडून बसलेल्या वाघाने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला . यानंतर वाघाने शेतकरी बळीरामला जवळपास ४०० ते ५०० मीटर पर्यंत जंगलात फरपटत नेले व त्याचा बळी घेतला . शंकरनगर येथील एक व्यक्ती सालमारा गावाकडे जात असताना त्याला सदर प्रेत दिसून आले . त्याने लगेच सालमारा गाव गाठून गावकऱ्यांना माहिती दिली . गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून ही माहिती वनविभागाला दिली . घटनेची माहिती मिळताच वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम , क्षेत्रसहाय्यक गाजी शेख राजेंद्र कुंभारे , वनरक्षक गेडाम , प्रिया करकाडे या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला . मृतक बळीराम यास पत्नी ४ विवाहित मुली आहेत . वनविभागाने अंत्यसंस्कारासाठी मृतकाच्या पत्नीस 30 हजार रुपयांची तात्पुरती सानुग्रह मदत केली . या घटनेमुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले  आहे . सदर वाघाचे नाव सि . टी. ८ असे असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले . जीव सालमारा एथिल इसमाचा गेला परंतु गावातील एक ही व्यकती व्यग्ररक्षक म्हणून न घेता दुसऱ्या च गावातील व्यक्ती घेतले म्हणून वनविभागावरती रोषही होत आहे तसेच वाघा पासुन गावं संरक्षण व्हावे याकरिता वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com