रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
सन २०२२ मध्ये सावरी ग्रामपंचायतचा तिव्र निषेध करुन भिम आर्मी संविधान रक्षक दल माकोना संघटनेच्या वतीने आंदोलन करुन माकोना गावातील टाकीच्या जवळील गटार हटवून लावले होते.
सदर प्रकरणात ग्रामपंचायत सावरी यांनी गेल्या १३ वर्षांपासून हलगर्जीपणा केला होता आणि त्यांना या गोष्टीची एकदाही खंत वाटली नाही.
पंरतु सदर प्रकार माकोना गावातील सामाजिक कार्यकर्ते जगदिश भाऊ मेश्राम भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष,उमाकांत रामराव सुर्यवंशी माकोना संघटना अध्यक्ष,यांच्या अध्यक्षतेखाली गावातील नागरिकांनी आंदोलन करुन परीसर स्वच्छ केला.
पंरतु आता नव्याने गट ग्रामपंचायत सावरी येथील निवडणूक जिंकुन आलेले सरपंच यांना वारंवार सांगितले असताना सरपंच यांनी हक्क बजावले नाही.
अक्षरश: गावातील नागरिकांना आजार होणे सुरू झाले. पंरतु या गटाराकडे लक्ष नाही.माकोना गावात सार्वजनिक स्वच्छालयाची व्यवस्था केली नाही.ठेकेदारांनी डाव साधला पंरतु सदर सार्वजनिक स्वच्छालयाचे बांधकाम ठेक्या अभावी अप्रत्यक्ष पणे सावरी ग्रामपंचायत उपसरपंच यांनी केले आणि यांची चौकशी करुन अपात्र करण्याची तक्रार सुध्दा विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहे.
आता माकोना गावाला शहर बनवनार असे भाष्य उपसरपंच निखिल डोईजड यांनी केले.पंरतु आज नागरिकांच्या जिवाशी काय खेळ होत आहे हे प्रत्यक्ष वास्तव पाहात नाही.
गावातील पिण्याचे पाणी गढुळ येत आहे.याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतचे पदाधिकारी नुसते आश्वासन देत मोकळे होऊन एकटे सरपंच यांच्यावर लोटवुन देतात.अशी माहिती सावरी ग्रामपंचायत सरपंच यांनी भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम यांना दिली.
सदर माकोना गावातील जुन्या शाळेच्या जागेचा सातबारा असताना सुद्धा अतिक्रमण काढण्यात येत नाही.ग्रामपंचायत पदाधिकारी करतात तरी काय?हा प्रश्न उपस्थित झाला आहे..
नागरिकांची मागणी आहे की कारभार सांभाळता येत नसेल तर पदाचा राजीनामा सादर करावा.नुसते पदासाठी मोठे आश्वासन देऊन खोटे पडू नये.पदाचा राजीनामा द्यावा व जनतेच्या सेवेतून मुक्त व्हावे अशी चेतावणी सुध्दा गावातील नागरिक आणि भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम यांनी दिली ली आहे.
सदर प्रकार खुप गंभिर आहे,त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा काय साध्य होणार?अशी शंका निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत सावरी नेहमी चर्चेचा विषय तालुक्यात बनला आहे.यांचे कारण नागरीकांसोबत खोटे बोललेले शब्द होत.
निवडणूक काळात यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी जगदीश भाऊ मेश्राम यांनी केली आहे.