राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
शासकीय धान्य दूकानातील ई पास मशीन मध्ये बिघाड असल्याने ऑफलाईन धान्य वितरणाचा शासकीय आदेश निघाला असतानाही धान्य वितरणास नकार देणार्या विक्रेता व प्रशासनाचा विरोधात आक्रमक भूमिका घेत येथील नगरसेवकानी त्याना धारेवर धरल्यानंतर अखेर सर्व लाभार्थाना सूरवात करण्यात आली.
राज्यासह जिल्हात सूद्धा ई पास मशीन मध्ये तांत्रिक बिघाड असल्याने लाभार्थाना जूलै महिण्याची ऑफलाईन अन्न धान्य वितरण प्रक्रिया रखडलेली आहे.
शासनाने कालच ऑफलाईन धान्य वितरणाचा आदेश काढलेला आहे मात्र आज महिण्याचा अंतिम दिवस असतानाही येथील राणाप्रताप वार्डातील शासकीय धान्य विक्रेता आदेश नसल्याची सबब सांगत लाभार्थाना धान्य देण्यास नकार देत होता.
त्यामूळे संतप्त लाभार्थाना सोबत घेत येथील शिवसेना उबाठा गटाचे तालूका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे व नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल यानी विक्रेत्याच्या दूकानावर धडक दिली.
आक्रमकपणे जाब विचारला यावेळी विक्रेत्याचा सबबीने समाधान न झाल्याने तिथूनच तहसीलदार रमेश कूंभरे याना भ्रमनध्वनीवर संपर्क करीत लाभार्थांची होणारी अडचण व निर्माण झालेली परीस्थीती त्याना सांगण्यात आली.
त्यानी लगेच पूरवठा निरीक्षक समाधान तायडे याना तिथे पाठविले यावेळी पदाधिकारी व लाभार्थांचा रौद्र रूप लक्षात घेत तायडे यानी शासनाचा आफलाइनचा आदेश निघालेला आहे हे मान्य करीत विक्रेत्याला सर्व लाभार्थाना ऑफलाईन धान्य वितरणाची सूचणा केली यानंतर सर्व लाभार्थाना धान्य वितरण करण्यात आल्याने त्यानी समाधान व्यक्त केले.