चिमूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार धरणे आंदोलनातंर्गत चव्हाट्यावर आणणार!..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

    चिमूर नगर परिषदेचा मनमानी व भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी धरणे आंदोलन २ आॅगस्टला काॅग्रेस पक्षातर्फे करण्यात येणार आहे.

        भोंगळ कारभार,भ्रष्टाचार,चिमूर शहरातील अनेक मुद्दे जनतेसमोर आणण्याकरिता एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन समन्वयक,चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ सतिशभाऊ वारजुकर यांच्या नेतृत्वात शुक्रवार, दि. २ ऑगष्ट ला दुपारी १२ वा. चिमूर तहसिल कार्यालयासमोर,करण्यात येणार आहे.

          चिमुर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या चिमुर वडाळा (पैकु),पिंपळनेरी,सोनेगांव (बेगडे), सोनेगांव (सिरास), खरकाडा, काग, बाम्हणी, शेडेगांव, केसलापुर, कवडशी ही संपुर्ण गांवे समाविष्ठ करून दि.30 मे 2015 रोजी चिगुर नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. 

        सन 2020 पर्यंत अध्यक्ष/उपाध्यक्ष,सभापती,नगरसेवक जनतेप्रती कार्य करीत होते.सन – 2020 पासुन मुख्याधिकारी प्रशासक म्हणुन संपूर्ण कारभार करीत आहे.

       नगरसेवक कोणीही नाही.चार वर्षा पासुन निवडणुक न होवु देण्याचे षडयंत्र कोणाचे? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

        मुख्याधिकारी नगर परिषद चिमुर येथे डॉ.सुप्रिया राठोड यांचा मनमानी कारभार कोणत्या लोकप्रतिनिधीच्या आधारावर सुरू आहे? चिमुर नगर परिषद मध्ये असणारे मुख्याधिकारीच्या भ्रष्टाचारावर व मनमानी कारभारावर आमदार का दुर्लक्ष करीत आहेत? हे नगर परिषदे अंतर्गत नागरिकांच्या लक्षात आणुन देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 

      चिमुरचे सी.ओ. यांनी चार दारूचे दुकान चिमूर शहरामध्ये सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले.तसेच अनेक बियर बार,बियर शॉपी सुरू करण्यासाठी सी.ओ. यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले.

          चिमुर नगर परिषदेचा मनमानी भ्रष्ट कारभार सुरू असुन शहरात पुर्णतः अस्वच्छता आहे,पिण्याच्या पाण्याची कमी कमी असणे,शहरात कुठेही सावर्जनिक स्त्रि-पुरुष मुत्रीघर तसेच सार्वजनिक शौचालयाची निर्मीती नाही. 

       असे अनेक मुद्द्यांवर येत्या दि.02/08/2024 रोजी शुक्रवारला चिमुर येथील तहसील कार्यालया समोर एक दिवसीय लक्षणीय घरणे आंदोलनाचे दुपारी 12.00 वा आयोजन करण्यात आले आहे.

       या धरणे आंदोलनात सहभागी होवुन आपल्या हक्कासाठी पुढे यावे असे प्रसिद्धी पत्रातून आव्हान करण्यात आले आहे.

***

आंदोलनाचे विषय…

    १) चिमुर शहर व ग्रामीण मध्ये 24 तासात 24 वेळा लाईन जाते त्यांचे काय? कुठे गेला 132 केव्हीचे सोंग?

  २) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दोन वर्षा अगोदर चिमुर मध्ये घोषणा केली होती.चिमुर साठी आमचे कडे मास्टर प्लॅन तयार आहे,तो कार्यान्वीत केला नाही तर बंटी भांगडिया आमच्या डोक्यावर केस राहु देणार नाही.तो मास्टर प्लॅन म्हणजे चिमुरातील जुने चांगले रस्ते फोडुन नविन रस्ते तयार करणे होय का? ही स्थिती स्वच्छतेचे बेहाल करणारी आहे.

    ३) चिमुर शहरात नाली बांधकामात अनेक समस्या आहेत तथा न.प.अंतर्गत विविध कामात भ्रष्ट्राचार आहे.नालीद्वारे पाण्याचा प्रवाह निट काढण्यात आला नाही.नालीची लाईन सरळ नाही.चिमुर येथील पेठ मोहला, कारकुड नगर,वडाळा (पैकु), तनिस कॉलनी,क्रांती नगर,सरकारी दवाखान्याच्या मागील कॉलनी,मानिक नगर, नेताजी वार्ड तसेच जी गांवे जोडल्या गेली वडाळा (पैकु), पिंपळनेरी,सोनेगांव बे,सोनेगांव सिरास,खरकाडा,बाम्हणी,शेडेगांव,केसलापुर,कवडशी रोडी या गांवाचे तर अनेक समस्या अंतर्गत बेहाल झाले आहेत.कोणत्या भाटाने करून ठेवले हे हाल?

   ४) चिमुर नगर परिषद अंतर्गत जुने चांगले रोड फोडून अनावश्यक नविन रोड करून करोडोंचा भष्ट्राचार करण्यात येत आहे.सर्व टेंडर मॅनेज करून भाजपच्या कार्यकर्त्याला काम देवून प्रचंड भष्ट्राचार करण्याचे काम केले आहे व जी गावे पक्या रस्त्यांने जोडली नाही त्यांचे काम करण्यात आले नाही.

     ५) चिमुर नगर परिषदे अंतर्गत पाणी समस्या गेल्या 10 वर्षा पासुन जैसे थे आहे.नेताजी वाई,गांधी वार्ड,टक्कर वार्ड,मानिक नगर तसेच जी गावे नगर परिषदला जोडलेली आहेत,तिथेही पाणी समस्या गंभीर आहे.सत्ताधा-यांनी चिमुर नगर परिषद क्षेत्रातील जनतेला वा-यावर सोडलेले आहे.

     ६). स्वच्छतेच्या नावाखाली चिमुर नगर परिषदेमध्ये कंत्राटदाराची नियुक्ती केली.पण चिमुर शहरात कुठेही स्वच्छता नाही.चिमुरात घाणीचे साम्राज्य असुन स्वच्छता विभागात करोडोंचा घोटाळा करण्यात आला,इंम्पीग यार्ड मध्ये कीती तरी गाड्या नादुरूस्त पडलेल्या आहे. हे कोणाचे पाप आहे ?

     ७) आरोग्या बाबत नियोजन ढिसाळ असुन आरोग्याच्या विषयांवर कसलेही नियोजन नगर परिषदे मध्ये नसून घंटा गाड्या,कचरा गाड्या धुळखात पडलेल्या आहेत.नगर परिषदेची अॅम्बुलन्स चिमुर पोलीस स्टेशनच्या आवारात धुळखात पडुन आहे.हे कोणाची मनमानी आहे?अंगणवाडी व अंगणवाडीचे विद्यार्थ्यांसाठी काहीही नियोजन नाही.

      ८) चिमुर मध्ये बालाजी सागर तयार करण्याचे स्वप्न सत्ताधा-यांनी पुर्ण केले नाही.10 वर्षात करोडौं रूपये खर्च करून अजुनही बालाजी सागर त्याच परिस्थितीतपडून आहे.यावरून यात करोडो रुपयाचा भष्ट्राचार झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.कोणाच्या घरी पैसा गेला?

    ९) वडाळा (पैकु) येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून अनेक भागात रस्ते बांधण्यात आले नाही,काही भागात रस्ते बांधकाम झाले.पण एकाच वर्षात सदर रस्त्यांची दैनावस्था करून ठेवलेली आहे.स्वच्छता नाही,या वार्डात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.

     वडाळा (पैकु) येथे पाण्याची टाकी बांधली.सरकारी जागेतुन पाईप लाईन करीता जागा सोडणे गरजेचे होते.आता पाईप जोडण्याच्या अडचणी निर्माण झाल्या.नगर परिषद सीओ.च्या व भाटाच्या चुकी मुळे असे झाले काय?

   १०) रोजगार हमी योजनेचे वैयक्तीक लाभाचे होणारे फायदे 10 वर्षा पासुन गायब ? उदा. सिंचन विहिर,रोजगार हमी..

        बालाजी रायपुरकर सभागृह हे चिमुर लोक-प्रतीनिधींच्या दबावाखाली सी.ओ.नी चुकीच्या पध्दतीने कंत्राटदाराकडून एका लोकप्रतिनिधीच्या खास कार्यकर्त्याला भाडेतत्वावर दिले असुन यांत गरीबा कडुन किराया पोटी 15000/- ते 20000/- हजार रूपये घेण्याचे काम सुरू आहे,हेच सभागृह नगर परिषदेने स्वतः चालविले असते. तर गोर गरिबांना फक्त 5000/- रूपयांमध्ये हे सभागृह उपलब्ध झाले असते.

      त्याच प्रकारे नव्याने निर्माण होणारे संत शिरोमणी संताजी सभागृह व संत तुकाराम महाराज सभागृह अवैधरित्या दिल्या जाण्याची भिती लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.म्हणुन सदरचे शहीद बालाजी रायपुरकर सभागृहाचे कंत्राट त्वरीत रद् करून नगर परिषदने स्वतः चालवावे व गोरगरिबांची होणारी लूट थांबवीणे गरजेचे आहे.

     १२). चिमुरमध्ये अवैद्य धंदे सुरू असुन सट्टा,जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.चिमुरचे आराध्यदैवत बालाजी मंदीराजवळ व त्यांच्या मागच्या बाजुला कार्यालय थाटुन अवैधपणे सट्टा,जुगार खुलेआम चालु आहे.सदर अवैद्य सट्टा, जुगार त्वरीत बंद करण्यात यावा.

    १२) मागील 10 वर्षा पासुन चिमुरातील इंदीरा नगर,वडाळा (पैकु),काडकुड नगर मध्ये आश्वासन देवुन कायम स्वरूपी प‌ट्टे देवु शकले नाही,करीता सदर इंदीरा नगर,काडकुड बगर येथील निवासी जनतेला कायम प‌ट्टे देण्यात यावे.या संदर्भात अनेक निवेदने आंदोलने झाली.परंतु अजुन पर्यंत गरीबांना प‌ट्टे मिळाले नाही.

    १४). नगर परिषद क्षेत्रातील गरीब घरकुल धारकांना अजुनपर्यंत पैसे मिळत नसुन याबात घरकुल धारकांना त्वरीत पैसे मिळण्याचा दृष्टीने हे आंदोलन आहे.

   १५) वडाळा पैकु येथील अनेक बोरवेल बंद अवस्थेत असुन जनतेने अर्ज करूनही सदर बोरवेलची दुरूस्ती नाही.त्यामुळे पाणी मिळत नाही. यापेक्षा अजुन काय दुर्दैव समजावे.

    १६). क्रिडा संकुलच्या बांधकामाच्या करोडो रूपये 10 वर्षात आले,पण काम झाले नाही. पैसे कुणाच्या घरात गेले हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

    १८). चिमुर नगर परिषद अंतर्गत लाईट लावणे करीता प्रत्येक प्रभागात पोल उभे करून दोन वर्ष होत आहे.परंतु लाईटची व्यवस्था नाही हे नगर परिषदचे दुर्दैव आहे.

    १९). अनु.जाती,अनु.जमाती,ओ.बी.सी.व्हिजे.एन.टी,अल्पसंख्याक तसेच बहुजनाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना 10 वर्षात गायब ?

 २०) एस.सी,एस.टी.यांच्या विकासाचा अनेक निधी गायब ?

   २१) चिमूर येथील जनतेला वेळेवर गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे अजुनपर्यंत दुसरी गॅस एजेंसी का देण्यात आली नाही? 21. जि.प.च्या माध्यमातुन वैयक्तीक लाभाच्या योजना शिलाई मशीन,ताडपत्री,तारेचे कुंपण, इंजन,मोटार पंप इत्यादी योजना अनेक शेतक-यांच्या वैयक्तीक लाभाच्या,अनेक तरूण व महिल्याच्या वैयक्तीक लाभाच्या योजना नगर परिषद निर्माण झाले तेव्हा पासून गायब.हया सर्व योजना जि.प.सारख्या नगरपरिषद चिमुरने योजना लागू करणे गरजेचे होते.अजुनपर्यंत योजना सुरू केल्या नाही कारणे काय ? 

      22) चिमुर शहरात गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसाठी अध्यावत अभ्यास केंद्र उभे का करण्यात आले नाही?

       या सर्व विषयातंर्गत शुक्रवारला तहसील कार्यालय चिमूर पुढे धरणे आंदोलन काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणार आहे.