नंदलाल पाटील कापगते विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात…

निलय झोडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

      नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 29 जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह राबविण्यात आला. 

           या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आले होते. 

            शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस या अंतर्गत विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती “टाकाऊ पासून टिकाऊ” साहित्य विद्यार्थ्यांनी तयार केले.

          दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आले. या दिवशी गणितीय खेळ, गणितीय क्रियांचा सराव, गणितीय कोड, अक्षरांपासून शब्द निर्मिती, भौमितिक आकार ओळखणे, संख्या वाचन घेऊन शेवटी गणितीय तज्ञ यांच्या विषयी माहिती देण्यात आली.

           तिसऱ्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आले. चौथ्या दिवशी विविध सांस्कृतिक बाबींची व बोलीभाषांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

           याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, कव्वाली, देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रम मनमोहकपणे पार पाडले. पाचव्या दिवशी कौशल्यधिष्टीत उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी कापडी पिशवी,कागदकाम ,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केले.

            सहाव्या दिवशी “ग्रीन डे” साजरा करून वृक्षारोपण करण्यात आले व मिशन लाइफ साठी इको फ्रेंडली क्लब ची स्थापना करण्यात आले.

            शेवटच्या दिवशी ‘समुदाय सहभाग दिवस’ तिथीभोज करण्यात आले.विद्यार्थ्यांना जेवणामध्ये जलेबी, लाडू, सेव विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एम.एम.कापगते सर यांच्याकडून देण्यात आले तसेच काकडी, गाजर ची व्यवस्था मिरासे सर यांनी केले.

            ‘अन्न हेच पूर्णब्रह्म’ या उद्दिष्टानुसार मुख्याध्यापिका आर. बी. कापगते यांनी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना जेवणासाठी एक स्वतंत्र निर्जंतुक खोली तयार करण्याचे व सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिता यावा यासाठी आर.ओ. मशीन लावण्याचे ठरविले. 

            या संपूर्ण शिक्षण सप्ताहा साठी मुख्याध्यापिका आर. बी. कापगते, एस.व्ही. कामथे, मिरासे, वेणू लिमजे, मीना शिवणकर, सोनाली क-हाडे, देशमुख, कटकवार, आर.बी. कापगते , के. एम. कापगते, बडोले, गहाणे, खोटेले व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.