उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती तालुक्यातील अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने बळीराजाचे शेतातील कृषी पंप चे पोल तुटून पडलेले आहेत आणि अनेक शेतातील असलेल्या डीपी खराब झालेल्या आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी आणि शहरातील होणारा दिवसा ढवळ्या, रात्री बेरात्री विजेचा लपंडाव सुरु असून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो त्याचे निराकरण करून नागरिकांना या भीषण गर्मी पासून मुक्त करावे या दोन्ही आशयाचे निवेदन म.रा.वि.वि.कं.चे उप अभियंता भद्रावती याना देण्यात आले.
अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने भद्रावती तालुक्यातील बळीराजाचे शेतातील असलेले कृषी पंप चे पोल हे तुटून आहे आणि डीपी सुद्धा खराब अवस्थेत आहेत. विद्युत पुरवठा दुरुस्त होत नसल्याने शेतातील जलसिंचन कसे करायचे कारण शेतीसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. असा मोठा प्रश्न बळीराजाच्या समोर उभा आहे आणि समोर शेतातील पेरणी च्या हंगामाला सुरवात होत आहे. सद्य स्थितित तालुक्यातील कृषी पंप चे तुटलेले पोल आणि डीपी दुरुस्त न झाल्यास अनेक शेतकरी वर्ग हा जलसिंचनापासून वंचित राहत असल्याकारणाने आपणास हि बाब निदर्शनात आणून देण्यात येत आहे. यावर दखल घेऊन तात्काळ कृषी पंप चे तुटलेले पोल आणि डीपी दुरुस्त करण्यात यावी.
तसेच भद्रावती शहरातील होणारा विजेचा लपंडाव सुरु असून विदुयत पुरवठा प्रत्येकी १ ते २ तासांनी वारंवार खंडित होतो. उकाड्याचे दिवस सुरु असून भीषण गर्मी आहे. आणि त्यात हा विजेचा लपंडाव हि बाब अतिशय गभीर असून आपल्या विदुयत विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण करणारा आहे. आपन या दोन्ही समसयेचे ८ दिवसाचे आत तात्काळ निराकरण करावे अन्यथा जनतेच्या जनहितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी म रा वि वि कं ची राहील. असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख यांनी दिला आहे.
या बाबतीत म रा वि वि कं च्या उप अभियंता याना निवेदन देताना सिकंदर शेख भाजपा चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष, प्रवीण सातपुते शहराध्यक्ष, पप्पू शेख, रुपेश मांढरे जिल्हा सचिव युवा मोर्चा, किशोर गोवारदिपे, प्रीतम देवतळे, सुरज पेंदाम, विकी सोनुने, श्याम मानकर, प्रवीण सिंग, उत्तम पोईनकर, सचिन नारायणे.