कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी : पारशिवनी तालुक्यातील वनपरिक्षेत्र हद्दीतील भागीमहारी गाव येथील शेतकरी शैलेश भोंडेकर (४३) हा गुरूवार ३० मे रोजी सकाळी ९ वाजता शेतात जात असताना अचानक पट्टेदार वाघ समोर आला. डरकाळी फोडताच भयभीत होऊन शेतकरी जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळू लागला. एका खड्ड्यात पडून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी पारशिवनी येथिल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पारशिवनी वनपरिक्षेत्रातील गावांमध्ये वाघांच्या मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले आहे. वाघाने अनेकदा पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून आपल्या अधिवासाची चाहूल दिली. वनविभागाच्या चमूने नयाकुंड गाव शिवारात काही दिवसांपूर्वी पट्टेदार वाघाला जेरबंद केले होते. दुर्दैवाने त्या वाघाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर शेतकरी, शेतमजुरांनी भयमुक्त होऊन शेतीकडे लक्ष केंद्रित करून कामाला गती दिली. पण भागीमहारीतील घटनेमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहे. भागीमहारी गाव जंगलव्याप्त क्षेत्रालगत आहे. शेतकरी शैलेश भोंडेकर हा गुरुवारी सकाळी शेतातील उन्हाळी धान कापणी करण्याकरिता जात असताना तलाव परिसरात ही घटना घडली.
या तलावाच्या परिक्षेत्रात एक दोन दिवसांपूर्वी पट्टेदार वाघाने नीलगायीची शिकार केली होती. त्यामुळे वाघ शिकाराच्या जवळपास राहून ताव मारत होता. शेतकरी शैलेश भोंडेकर याला हे माहीत नव्हते. त्यामुळे तो भयमुक्त होऊन शेतात धान कापणी करिता जात होता. पण शेतकरी शैलेश भोंडेकर यांच्यासमोर अचानक वाघ आला. डरकाळी फोडल्यामुळे तो घाबरून सैरावैरा पळू लागला. पळताना खड्यात पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पारशिवनी येथिल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रि उशिरापर्यत पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली असुन आज पुनः दुसरी शस्त्रकिया केली जाणार अशी माहीती जख्मी चे भाऊन प्रेम भोंडेकर यांनी दिली.
वनविभागाने शैलेश भोंडेकर यांच्या उपचारासाठी आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी शेतकरी शैलेश भोंडेकर यांचे बंधू प्रेम भोंडेकर आणी गावातील नागरिकानी संबंधित अधिकारी याना मागणी केली आहे.
पारशिवनी वन परिक्षेत्र अधिकारी श्री अनिल भगत यांनी सांगीतले की पिढीत शेतकरी शैलेश भोडेंकर यांचे वर काल गुरुवारी पट्टेदार वाघाना हल्ला केल्याने त्या पिढीत शेतकरी यांना नियमानुसार मुआवजा दिले जाणार आहे आणी विभागातर्फे कार्यवाही प्रारभ केली असुन लवकरात लवकर पिढीत शेतकरी यांना मुआवजा दिला जाणार अशी माहीती भेट दरम्यान पारशिवनी वन परिक्षेत्र अधिकारी श्री अनिल भगत यांनी दिली.