पुन्हा साकोलीत भ्रष्टाचारी अवार्ड सिमेंट रोड फुटला… — भ्रष्टाचाराच्या लिपापोती कारभाराला कमिशन दलाल जबाबदार,पण जनता अजूनही झोपेतच रूबाबदार…..! 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

        Bसाकोली : शहरात नविनच सिमेंट रोडास भेगा पडणे, सळाखी दिसणे, निकृष्ट साहित्य वर येणे हे या शांतमय साकोलीत नविन पराक्रम नाही. पण आता तर ११ महिन्यांपूर्वी तयार झालेला सिमेंट रोड चक्क फूटून गति अवरोधक तयार होण्याचा “भ्रष्ट अवार्ड” कारनामा समंधीत ठेकेदार व कमिशन दलालांनी येथे करून ठेवलेला आहे. व पुढेही नगरपरिषद निवडणुक होईपर्यंत हे लूटमार कार्य सुरूच ठेवणार आहेत. आणि यावर जनता एक ब्र ही काढणार नाहीत हे या साकोलीतील मुख्य आकर्षक आहे. 

          मुख्य साकोली शहर न्यायालय समोर तालुका भुमिअभिलेख कार्यालय येथून ११ महिन्यांपूर्वी नगरपरिषदेच्या कंत्राटदारांनी हा रोड तयार केला. मागे रोडवर निव्वळ वाळूंचे कण उडीत असता येथील काहींनी फक्त सोशल मिडीयातून आपला पॉवर दाखविला होता पण साधी तक्रारही करण्यासाठी कुणीही समोर आले नव्हते. येथून काही जड माल घेऊन लोडेड ट्रक यांना परवानगी दिली कुणी.? हा सवाल जनतेने उचलला पण कितीतरी वाहनांनी सिमेंट रोड फुटू शकते का.? हा पण खोचक प्रश्न आहे.

            प्रभाग क्र ०९ सिव्हिल वार्ड हा मुख्य रोड असून भुमि अभिलेख कार्यालय समोर रोड पूर्ण क्षतिग्रस्त होऊन सिमेंट व साहित्य वर आले आणि खालील सी एन जी ( बेड ) माती दिसत असून उंचवटा होत या रोडवर जणू गति अवरोधक निर्माण झाले आहे. हा रोड आता फुटल्याने एका जागृत जनतेने नगरपरिषद अभियंता यांना सांगितले पण “तीन माकडांची भूमिका” येथे कायम आहे.

           तसाच प्रकार अख्ख्या साकोली सेंदूरवाफा शहरात सुरू आहे. कारण जोपर्यंत येथे प्रशासक राज सुरू आहे तोपर्यंत असेच लीपापोती व शासनाच्या पैशाची अफरातफरी धुळधाण प्रकरणी सुरूच राहणार पण यावर येथे कुणीही एक साधा शब्दही काढणार नाहीत आणि अश्याच शांतमय वातावरणामुळे भ्रष्टाचार करणा-यांचे मनोबल या साकोलीत वाढत आहे असा आरोप आता फक्त सोशल मिडीयातून केला जात आहे. 

          मुख्य जूने शहर सिव्हिल वार्ड क्रं ०९ मधील हा मुख्य प्रभाग रोडाची ऐशीतैशी झाल्याने आता संबधीत नगरपरिषदेच्या अधिका-यांनी कंत्राटदारांचे अंदाजपत्रक नुसार सविस्तर चौकशी करावी. किती साहित्य टाकणे होते.? किती मीटर टाकले.? लोखंडी सळाखींचा चौरस किती.? अंदाजीत किंमत किती.? खर्च किती.? किती बनविला.? कमिशनात पार्टनर किती.? यांची आता चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

           याबाबत आज शुक्रवार येथील काही जागरूक सामाजिक कार्यकर्ते नगरपरिषदेच्या अधिका-यांना भेटणार असल्याची माहिती “दखल न्युज भारत” ला जनतेनी सांगितले आहे.