4 जून 2024 पासून संविधानाची खरी ताकत सर्वच संविधानविरोधी शक्तीला दाखवून देण्यातच घालवीन…….
कारण,प्रत्येकजण कोणत्यातरी धर्माचा, राजकीय पक्षाचा व नेत्याचा अनुयायी आहेच.
परंतू,मानवता धर्माला आणि संविधानाला कुणी वालीच नाही….!
— म्हणूनच हे शपथपत्र….
कारण,माझ्या बाबासाहेबांनी संविधान निर्मितीसाठी कुटनीतीच्या विरोधकांना आपल्या सत्यवादी,मानवतावादी, विज्ञानवादी,विवेकवादी विद्वत्तेच्या बळावर चारी मुंड्या चीत करून संविधानक्रांती या देशात घडवून आणली.
त्यानंतर तिला सांभाळण्याची आणि जागृतीतून तेवत ठेवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्यजनावर टाकली होती. परंतू , माझ्यासारख्यानी स्वतःच्या साडी, माडी, गाडीत मग्न झाल्यामुळे म्हणा किंवा कोणत्याही हतबलतेमुळे माझ्यासारखे आम्ही लायक ठरू शकलो नाही………
जेंव्हा संपूर्ण व्यवस्थाच ( कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, न्यायमंडळ, निवडणूक आयोग आणि पत्रकारिता ) जर संविधानविरोधी शक्ती एकवटून, बाबासाहेबांनी केलेली संविधान क्रांतीच संपूर्ण नष्ट करू पाहत असेल………
तर माझ्यासारखा संविधानवादी नेभळट, षंढ, नपूंसक बनून घरात 4 जून नंतर कसा स्वस्थ बसू शकतो…..!
केवळ 70 वर्षातच संविधान आभाळच फाटलंय…….
ठीगळ कुठं कुठं लावायचं….?
धरणच फुटलंय तर बांध कुठं कुठं घालायचा…..?
सर्वच राजकीय पक्षातल्या सर्वच नेत्यांच्या विरोधात जरी पंगा घ्यायला सुद्धा मी मागेपुढे पाहणार नाही. कारण यांनाच प्रथम संविधानाची शक्ती दाखवणे हे माझे कर्तव्य असेल…..
गेल्या 70 वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकीय नेत्याने संविधानक्रांती समजून न घेता उलट तीचे उल्लंघन करण्यातच त्यांनी प्रयत्न केले. जनतेलाही जागृत करण्यापासून रोखण्याचे काम या बेशरम राजकारण्यांनी केले.
असो कुणाला दोष देण्यात जीवनातला वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रपंचाबरोबरच किंबहुना प्रपंचापेक्षाही झुकते माप देऊन “संविधान क्रांती ” जपण्यासाठीच जीवन व्यतीत करणे हे मी माझे जीवन ध्येय समजून कृतीत उतरणार आहे……
त्यासाठी तन,मन आणि धनाने त्यागातून, संघर्षातून समर्पित होऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढणार……
लढणार……..
आणि लढतच राहणार……