कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- तालुका बिज गुणन प्रक्षेत्र डूमरी येथे दिनांक 31/05/2024 रोजी सकाळी 9.30 वा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नागपूर अंतर्गत तालुका बिज गुणन प्रक्षेत्र डूमरी तालुका पारशिवनी येथे शून्य मशागत तंत्रज्ञान सगुणा राईस टेक्नॉलॉजी आधारित एक दिवशीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 31/05/2024 रोजी सकाळी 9.30 वा तालुका बिज गुणन प्रक्षेत्र डूमरी ता. पारशिवनी येथे शून्य मशागत तंत्रज्ञान सगुणा राईस टेक्नॉलॉजी यावर आधारित एक दिवशीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ.अर्चना कडू प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतकरी याना म्हटले की शेतकऱ्यांना शून्य मशागत तंत्रज्ञान सगुणा राईस टेक्नॉलॉजी एस आर टी यावरील आधारित तंत्रज्ञानाचा भात पिकाकरिता अवलंब करावा असे आवाहन प्रकल्प संचालन डॉ. अर्चना कडु यांनी केले. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले वातावरणातील बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम व उत्पादनात होत असलेली घट या सर्व गोष्टीचा विचार करून पीक लागवडीत बदल करणे व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करने गरजेचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
तसेच प्रकल्प उपसंचालक श्रीमती पल्लवी तलमले यांनी एस आर टी तंत्रज्ञानाच्या वापर करून उत्पादनात वाढ करून खर्च कसा कमी करता येईल याबाबत माहिती दिली.
तज्ञ प्रशिक्षक श्री मयूर लोथे यांनी सादरीकरणातून एस आर टी पद्धती बाबत माहिती दिली तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री परशुराम आगीवले यांनी एस आर टी पद्धतीमध्ये विविध पिकाची लागवड कशी करावी तन नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी तालुके उमरेड, भिवापूर , कुही,कामठी पारशिवनी ,रामटेक, मौदा तालुक्यातील एकुण 70 शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला असून सन 2024-25 खरीप हंगामात आत्मा अंतर्गत एस आर टी पद्धतीने 50 भात पीक प्रात्यक्षिके घेण्याचे नियोजित केले आहे.
या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी पारशिवनी मा.श्री सुरज शेंडे व श्री प्रमोद सोमकुवर कार्यक्रमांची रूपरेषा व नियोजन करण्यात आले.तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक , कृषी सहाय्यक,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन ताकसांडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कुही यांनी केले व कार्यक्रमाची सांगता श्री सचिन गणवीर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भिवापूर यांनी केली