ऋषी सहारे
संपादक
एटापल्ली:-तालुक्यातील एटापल्ली-डुम्मे-जवेली रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्यात आले असून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून सदर रस्त्याची दुरवस्था झाली होती.रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.त्वरित या रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिकांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केली होती.त्यांनी या कामासाठी 2.04 कोटींची निधी उपलब्ध करून दिल्याने सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
स्थानिकांना आता या रस्त्यावर अडचण भासणार नाही अशी व्यवस्था करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केला आहे.काम पूर्ण होताच संबंधित कंत्राटदाराने अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण केले.यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोक्कुलवार,अहेरी चे नगरसेवक अमोल मुक्कावार,लक्ष्मण नरोटे, संबंधित कंत्राटदार व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
डुम्मे नाल्यावर पुलाचेही झाले बांधकाम..
सदर रस्त्यावर मोठा नाला असल्याने पावसाळ्यात रहदारीसाठी अडचण होत होती.डुम्मे नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी मोठी निधीची आवश्यकता होती. आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल 3.42 कोटींची निधी मिळाली.आता डुम्मे नाल्यावर पुलाचे बांधकाम झाले असून याचेही लोकार्पण करण्यात आले आहे.