डॉ.जगदिश वेन्नम
संपादक
गडचिरोली:-
अहेरी तालुक्यातंर्गत असलेल्या मौजा महागांव (बुज) या ग्रामपंचायत येथील गावकऱ्यांनी गावातील सांडपाणी व्यवस्थित रित्या जाण्यासाठी नाली बांधकाम व्हावे,या संबंधाने गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे समस्या मांडली होती आणि त्यासोबतच महागाव बूज ग्रामपंचायत मुख्य मार्गावर लोकांना पाण्याची सोय व्हावी यादृष्टीने बोरवेल बांधकाम पूर्ण होऊन गावकऱ्यांना पाण्याची सुविधा व्हावी अशी समस्या येथील गावकऱ्यांची होती.
त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव बूज ग्रामपंचायत येथील स्थानिक गावकऱ्यांना आश्वासन दिले की आपण दोन्ही विकासात्मक कामे लवकर पूर्ण करणार आणि आज या कार्याचा पाठपुरावा करत गडचिरोली जिल्हा परिषद सन 2022-2023 अंतर्गत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत नाली बांधकाम आणि तसेच प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना सन 2022-2023 अंतर्गत बोरवेलचे बांधकाम आणि विविध लाखो रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी महागाव बूज येथील सरपंच पुष्पा मडावी, उपसरपंच संजयजी अलोने,ग्रामपंचायत सदस्य लालू वेलादी, सदस्य दिपाली कांबळे, प्रतिष्ठीत नागरिक महादेव वेलादी, सुरेश वेलादी, बाळू अलोने , सचिन करमे, मोनेष पाटील, धम्मदिप झाडे, आकाश वेलादी, राजेश मिसलवार, रविंद्र मुंजमकार, श्रिकांत चालूरकर, एंकलू वेलादी, निखिल कोरेत, प्रकाश वेलादी, हनूमंतू चेन्नरवार, महेश गोंगले, राकेश गोंगले, अजय पानेम, शंकर दहागावकर, अशोक टेकूल, तिरूपती मेरगूवार, माधव झाडे, बुदेश्वर झाडे, श्रिनिवास अलोने, शंकर मुंजमकार, विजू अलोने, कैलास अलोने मनिष दहागावकर, तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.