जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आळंदीत जनजागृती रॅली…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : आज दि.३१ मे, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त, आळंदी येथील,,”इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कैन्सर इन्स्टिट्यूट” तर्फे, आळंदी शहरात एक जनजागृती मोर्चा व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटल पासून चाकण चौक,वडगांव चौक,आळंदी पोलिस स्टेशन तसेच श्री.ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसर,या ठिकाणी,हे पथनाट्य सादर करण्यात आले,आज एकादशीनिमित्त गर्दी असल्यामुळे भाविकांची शहरामध्ये खुपचं गर्दी दिसत होती, सर्वांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.सर्व सहभागी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. इंद्रायणी हॉस्पिटलचे डॉ.नितीन गोसावी यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

        आळंदी देवाची पोलीस स्टेशन येथे रॅलीचे स्वागत पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, राहुल चव्हाण, अविनाश राळे,मच्छिंद्र शेंडे, नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर,सचिन गिलबिले, सुरेश भोसले आळंदी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.