डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
एटापल्ली येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे निवडणूक आज पार पाडले.यात आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे उमेदवारांनी बाजी मारली असून बिजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभद्र उमेदवारांना पुन्हा एखादा पराभवाला सामोरे जावे लागले. सदर निवडणूक आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व जि.प.माजी उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती रविंद्रबाबा आत्राम,यांच्या नेतृत्वात तर आविसंचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टमी व तालुका सचिव प्रज्वल नागूलवार यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आली.या निवडणूकीत अध्यक्ष म्हणून सत्तू रामा गावडे तर उपाध्यक्ष म्हणून मधुकर रामदास मडावी,सदस्य म्हणून रायनेद्र दिसुजी मडावी,संचालक श्री.नारायण भालू कोरेत,भालू वंझा मडावी,संचालक श्री.तिरुपती माधव मडावी,संचालक श्री.खुशाल भीमा चापले,संचालक श्री.शामराव नागो सोनुले,संचालक श्री,अनिल सोमजी करमरकर,संचालिका बंदेबाई कोमठी कांदो,रुखमाबा साईनाथ उसेंडी,जितेंद्र दशरथ टिकले आदी निवडून आले.आविसंचे नेते माजी जि.प.अध्यक्ष व बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार व बाजार समिती उपसभापती रवींद्र बाबा आत्राम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सदस्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या विरोधात श्री.रमेश टिकले,कृषी उत्पन्न बाजार समितीत उमेदवार म्हणून उभे होते मात्र त्याच्यात बाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर अभद्र युती करूनही रमेश टिकले पराभूत झाले त्यानंतर एटटापली येतील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुका घोषित झाले,व काल निवडणूका पार पडले यात अध्यक्ष म्हणून सत्तू रामा गावडे यांच्या एकाच अर्ज असल्याने सर्वानुमते ठराव परित करून बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदासाठी आविस तथा अजयभाऊ मित्र परिवार कडून श्री.मधुकर रामदास मडावी तर बाजपा राष्ट्रवादी कॉंग्रेस अभद्र युतीकडुन जितेंद्र टिकले यांनी अर्ज दाखल केले,मात्र आविस तथा अजयभाऊ मित्र परिवार चे श्री.मधुकर मडावी यांना गुप्त मतदानातून बहुमत मिळाले असून ते उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले असून कृषी उत्पन्न बाजार समिती व आदिवासी विवीध कार्यकारी संस्थेत राष्ट्रवादीचे रमेश टिकले यांच्या तरुण पराभूत झाले असून,टिकले यांच्या गटातील कार्यकाळातील अविका संस्थेतील मोठा भ्रष्टाचार झाले असून सदर भ्रष्टाचार उजेडात येवू शकतो.
यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे, नरेश गर्गम, उमेश आत्राम, विनोद रामटेके, रवी भोयर, प्रमोद गोडसेलवार, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.