एम.टी.कोचे सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

     साकोली -आज दिनांक 31 मे 2023 रोज बुधवार ला नंदलाल पाटील विद्यालय साकोली येथील सेवाजेष्ठ शिक्षक एम टी कोचे सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम विद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. 

      या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य के.एस. डोये सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.एन.पी.बावनकर सर ,प्रा.बी.पी.बोरकर सर, सौ.आर बी कापगते मॅडम, सी.जी.झोडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.

   सत्कारमूर्ती एम. टी. कोचे सर व त्यांच्या अर्धांगिनी सौ कोचे मॅडम यांचा शाल व श्रीफळ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आले. 

   एम. टी. कोचे सर हे शांत, सुस्वभावी व अतिशय मनमिळाऊ व्यक्ति असून आपल्या शालेय कामात तरबेज व वेळेवर निर्णयक्षमता आणि हजरजबाबीपणा , विद्यार्थ्यांच्या हितार्थ उपक्रमशील शिक्षक असून साधी राहणी व उच्च विचारसरणी असून अशा व्यक्तीची विद्यालयाच्या प्रगतीसाठी आवश्यकता आहे, त्यांची उणीव आम्हाला नेहमी भासत राहणार असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य के. एस. डोये सर यांनी व्यक्त केले. 

   डी.डी.तुमसरे सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोचे सर हे विद्यार्थ्यांना हसत खेळत व आनंदी वातावरणात विनोदी शैलीतून व कठीणाकडून सोप्याकडे अध्यापन करताना विद्यार्थ्यांचे ज्ञान कसे टिकून राहील यासाठी नेहमी धडपड करायचे, असे मत व्यक्त केले. 

 याप्रसंगी विद्यालयातील कामथे सर, क-हाडे मॅडम, बि.पी.बोरकर सर व इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपआपले मनोगतातून मनमिळाऊ, स्मितहास्य, साधी राहणे व उच्च विचारसरणी असा शब्दप्रयोग करून आपले मनोगत व्यक्त केले. 

 कार्यक्रमाचे संचालक डी एस बोरकर सर यांनी तर आभार प्रदर्शन आर व्ही दिघोरे सर यांनी केले.