सरपंच खोब्रागडे यांच्याकडून भोजन वाटप समितीस टी-शर्ट  वाटप… — गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे औचित्य…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- एकोडी येथील क्रियाशील सरपंच संजय खोब्रागडे यांनी गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्षाचे औचित्य साधून एकोडी येथील भोजन वाटप समितीतील सर्व मेहनती व होतकरू मुलांना स्वत:कडून दि.३० मार्च २०२५ रोजी टी- शर्ट वाटप केले.

      राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस असणारे व गावविकासाच्या ध्येयाने झपाटलेले व्यक्तिमत्व असलेले तसेच गरजू विद्यार्थी असोत अथवा गरजू कोणीही असो, विविध माध्यमातून मदतीसाठी उदार अंत:करणाने तत्पर असणारे संजय खोब्रागडे यांनी गावच्या अथवा गावाच्या आसपासच्या कोणत्याही धार्मिक अथवा सामाजिक कार्यक्रमात भोजन वाटपासाठी सदैव तत्पर असणार्‍या या गरजू मुलांना प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने टी-शर्ट वाटप केले. यावेळी या सर्व मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णनिय होता.

      एकोडी येथे आयोजित या टी-शर्ट वाटप कार्यक्रमाप्रसंगी सरपंच संजय खोब्रागडे यांच्या सोबत माजी जि.प. सदस्या माहेश्वरी नेवारे, ग्रा.पं.सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते हेमराज नेवारे, उपसरपंच रिगण राऊत, ग्रामपंचायत अधिकारी गौतम खंडाळे आदी उपस्थित होते.