भारताला महापुरुषांच्या पुतळ्यांची नव्हे, तर त्यांच्या आदर्श आचरणांची गरज….. 

     आज आमच्या देशातील प्रत्येक धर्म आणि जातीसाठी पुतळे आणि स्मारकांचे पीक फार जोमात आलेले आहे. त्याला कारणही तसेच आहे. आमचा गटागटात विभागलेला डबक्यातला समाज, सामाजिक सभागृहाच्या नावाखाली मंदिरांची निर्मिती करतो. वाचनालयाच्या नावाखाली एखादा हॉल बांधून घेतो. जिमखाण्याच्या नावाखाली प्रशस्त इमारत बांधून घेतो. समोर पटांगणात त्या त्या जातीनुसार महापुरुषांचे पुतळे स्मारके बांधून घेतो. आणि वर्षभरात त्या त्या महापुरुषांच्या जयंती आणि स्मृती दिनाच्या निमित्ताने लोकांकडून वर्गणी गोळा करून मोठी मिरवणूक डी. जे. लावून काढणे ( बेशुद्ध अवस्थेत ) रात्रभर मिरवणुकीत नाच गाण्यासाठीच जणू आमचा जन्म झाला असंच काहीसं वातावरण निर्माण आम्ही करून, महापुरुषांचे उपकार फेडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो……

        कोणत्याही धार्मिक कार्यासाठी शासकीय तिजोरीतून पैसा खर्च करण्याची तरतूद संविधानातून नसतानाही हे असं का घडतं…….?

      याचे कारण हेच की येथील राजकीय पक्षांचे नेते ( विरोधी आणि सत्ताधारी ) नितिभ्रष्ट अधिकारी हे संविधानातील वाटा / पळवाटा शोधून जनतेतील अंध श्रद्धेतून असलेल्या लोकशाहीतील ” विभूतीपूजेला ” खतपाणी घालून जोपासण्यासाठीच आपली चाणक्यणिती खर्ची घालतात. आणि समाजाचे, देशाचे वाटोळे करण्यात सिंहाचा वाटा उचलतात. हाच आमच्या देशाचा दुर्दैवाने इतिहास गेल्या, 75 वर्षाचा निर्माण झाल्यामुळेच आमच्या देशातून लोकशाही आणि संविधान ICU मध्ये गेलेले आहे…..!

       अशा धर्म, अंधश्रद्धा, कर्मकांड, भाग्य, नशीब, दैव, या संकल्पनेमुळेच आमचा देश सुमारे 5000 वर्षांपासून परकीयांच्या गुलामीत होता. यातून देशाला कायमचे बाहेर काढण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान आणि लोकशाही दिली. परंतु , आम्हाला ते पचनी आणि अंगवळणी पडू शकले नाही. म्हणून आम्ही संविधान अंमलबजावणीच्या 75वर्षात पुन्हा त्याच गटार गंगेत न्हाऊन निघण्यास एका वेगळ्या स्वरूपात तयार झालो.

        विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी बनण्यासाठीच केवळ संविधान आणि लोकशाहीच नव्हे तर प्रत्येक धर्म आणि जातीत जन्मलेल्या प्रत्येक महापु्रुषांनी आपल्या वैचारिक क्रांत्या केलेल्या होत्या. परंतु , त्यांच्या क्रांत्या आणि आदर्श विचार आणि आचारसरणी आम्ही पुतळे आणि स्मारकात……..

  “कायमचे बंदिस्त करण्यासाठीच या RSS ने ठरवल्यामुळेच “

          आमचा बहुजन समाज आणि स्वतःला सद्बिचारी समजणारा आंबेडकरवादी समाज सुद्धा या कुटनीतीला बळी पडून स्वतःचाच आत्मघात करायला एका पायावर तयार झालेला आहे.

      याचे दुष्परिणाम आमच्या पुढच्या भावी पिढीला भोगावेच लागणार. याचे भान अजूनही आम्हाला आलेले नाही. हीच खरी आमची शोकांतिका आहे.

     अशा प्रकारच्या मानसिक गुलामीतून देशाला व समाजाला बाहेर काढण्याचा विडा बहुजन समाजातील, ओबोसी समाजातील, आंबेडकरी समाजातील खऱ्या ( चार भिंतीतील शिक्षण न घेतलेल्या ) बुद्धीजीवी युवापिढीने उचलला तर निश्चितच देशाचे भविष्य उज्वल दिसण्याची अपेक्षा आहे……..

     अन्यथा आम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्षे साजरे करूच की नाही याची शंका आहे…..!

          केवळ आणि केवळ महापुरुषांच्या आदर्श क्रांतीच्या आचारावरच देश तरेल तेही संविधानाच्या 100% अंमलबजावणीवरच……..

     इतर कोणताही मार्ग नाही…….

  जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता 

         अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689