
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- मदनापूर येथील रहिवासी असलेल्या युवकाचा मृत्यूदेह गावाशेजारील विहिरीत आज दोन वाजताच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.मृतक युवकाचे नाव राहूल मदनदास शेंडे असे आहे.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मदनापूर येथील राहूल मदनदास शेंडे वय २५ वर्ष हा युवक दोन दिवसापासून बेपत्ता होता.यासंबंधाने चिमूर पोलीस स्टेशन मध्यें नातेवाईकांनी तक्रार दिली होती.
वृत्त असे कि चिमूर तालुकातंर्गत मदनापूर येथील राहूल शेंडे हा दोन दिवसापासून बेपत्ता होता,आई वडीलांनी शोधशोध केली असता त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता.त्यामुळे चिमूर पोलीस स्टेशन मध्यें त्यांनी मुलगा फरार असल्याची तक्रार दाखल केली होती.
राहुल शेंडे यांच्या शोधाचे सूत्रे चिमूर पोलीसांनी फीरवताच मौजा मदनापूर गावाशेजारील विहिरीतच राहूल शेंडेंचा मृतावस्थेत शव आढळून आले.
या घटनेची माहीती मिळताच चिमूरचे साहाय्यक पोलीस नीरीक्षक एम.एन.ताळीकोटे,पी.एस.आय.घनश्याम नवघरे,हे पोलीसांसह घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आले.
मृत्यूमागचे कोणतेही कारण कळू शकले नाही.दारूचे अति व्यसन असल्यामुळे ही आत्महत्या केली असावी असा अंदाज लावण्यात आला असला तरी मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाला नंतरच पुढे येणार आहे.
मृतकामागे आई,वडील,एक बहीण आहे.घटनेचा पूढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.