रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे वार्षिक महोत्सव 2025 चा समारोपीय समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अर्चना वंजारी चिमूर नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितले की परिस्थिती कितीही वाईट किंवा गरिबीची असली किंवा कोणत्याही शाखेला प्रवेश घेतला तरी वर्तमान काळात ध्येय निश्चित असल्यावर पारिश्रम घेतले तर आपण उच्च ध्येय गाठू शकतात.
त्यांनी स्वतःच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द आणि संयम असणे फार गरजेचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अवांतर वाचन खूप महत्त्वाचे असे सांगितले. न्युनगंड बाळगू नये.समोर आलेल्या परिस्थितीला शरण जाऊ नये असे सांगितले.
दीप्ती मरकाम, पोलीस उपनिरीक्षक चिमूर यांनी विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. वार्षिकोत्सव समारोपाचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते पार पडले.श्री शरद नंदनवार आयुध संचालनालय नागपूर यांनी आपल्या मार्गदर्शनात उच्च ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यानी सतत अपडेट असावे.
त्यांनी बोर्फास तोफा बनविण्याचा यशस्वी प्रवास विशद केला. प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी वार्षिकोत्सवा मुळे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व प्रखर बनते प्रत्येकानी सहभागी व्हावे. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन यशस्वी विद्यार्थ्यांची गौरवगाथा विशद केली.गांधी सेवा शिक्षण समितीचे प्रा.विनायकराव कापसे प्रा.मारोतराव भोयर श्री.कुंदन बारापात्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशुतोष पोपटे प्रास्ताविक कॅप्टन व उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बनसोड यांनी केले.आभार कानिष्ठ महा उपप्राचार्य प्रा.राकेश कुमरे यांनी मानले. प्रा.डॉ.उदय मेंडुलकर प्रा.दुर्योधन रोकडे प्रा.गजानन चव्हाण प्रा.निलीमा तुराणकर प्रा.चेतन चोधरी प्रा.प्रविण वाकडे यांनी वार्षिक महोत्सव प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा महोत्सवात गुणवंत विद्यार्थ्याना पुरस्कार व प्रमाणपत्र वितरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वार्षिकोत्सव प्रभारी डॉ.प्रफुल राजुरवाडे डॉ. कार्तिक पाटील डॉ.हरेश गजभिये, प्रा पितांबर पिसे,प्रा. गुणवंत वाघमारे उपस्थित होते. वार्षिकोत्सव -२० २५ ला विद्यार्थ्यानी उदंड प्रतिसाद दिला.