ऋषी सहारे
संपादक
एजाज पठाण
प्रतिनिधी
मालेवाडा :- कुरखेडा तालुक्यातील मौजा कसारी येथे ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेवाडा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) महाविद्यालय स्तरीय सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात महाविद्यालयातील NSS स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध उपक्रम राबवले. यामध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, ग्रामसाफाई आणि जनजागृती कार्यक्रमांचा समावेश होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी युवकांनी समाजासाठी योगदान देण्याच्या संधीचा उपयोग करावा असे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्याचा अनुभव जीवन घडवण्यास मदत करतो, असेही सांगितले.
या कार्यक्रमाला संस्थे चे अध्यक्ष रेखा बनपुरकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. कांबळी सर, विशेष अतिथी प्रा. डॉ. खालसा सर व महाविद्यालयाचे प्राध्यापक, NSS कार्यक्रम अधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी आयोजकांचे अभिनंदन केले.