ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाहभत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि. २६ डिसेंबर २०२४ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभघेणेकरिता विद्यार्थ्यांना ११वी, १२वी तसेच इयत्ता १२वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जिल्हा व तालुकाच्या च्या ठिकाणी ५ कि.मी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी १२वी/पदवी/पदविका परिक्षेमध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे.
तसेच या योजनेचा लाभ घणेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न् अडीच लाखापर्यंत असावे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसुचितजाती व नवबौद्धप्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे या नवीन ऑनलाईन पद्धतीमध्ये नव्याने काही applicatation add झालेले आहेत. जसे की. SEND BACK BUTTON लाइव झालेले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना status allotment pending दाखवत आहे त्यांचे अर्ज ऑनलाईन send back करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांना सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची त्रुटी पुर्तता करता येईल.
ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज ऑनलाईन भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले लॉग ईन आय डी अर्ज approved प्रोसेसपर्यंत चेक करित रहावे जेणेकरुन कुठल्याही विद्याथ्याचा अर्ज पेंडींग राहणार नाही. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ. सचीन मडावी, यांनी केले आहे.
(टीप-Online site-https://hmasscrutinyworkflow.mahait.org/)
(विद्यार्थ्यांनी स्वतः चा log in id व password टाकुन स्वतःचा status check करावा)