टिळक चौकात ओपन जिम लावा, नगर परिषदेला निवेदन देत युवारंगची मागणी…

प्रितम जनबंधु

    संपादक 

 आरमोरी :- शहरातील वार्ड क्र.5 मधील टिळक चौक येथील प्रसिद्ध दुर्गा माता देवस्थान परिसरात नागरिकांना व्यायमासाठी अथवा विरंगुळा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची साधन नाही त्यामुळे नागरिकांना व्यायामासाठी दूरवर बर्डी परिसरात जावे लागते.अंगणवाडीतील लहान मुले व मुली वॉर्डातील मुले नेहमी दुर्गा मंदिर समोरील अंगणवाडीत खेळत असतात  तिथल्या खुल्या जागेवर ओपन जिम व छोटासा गार्डन करण्यात यावा जेणे करुन वार्डातील मुले व अंगणवाडीतील लहान मुले व मुली तिथे खेळातील व परिणामी त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होईल त्यामुळे लवकरात लवकर वार्डातील नागरिकांनी टिळक चौक परिसरात ओपन जिम लावून देण्याची मागणी आरमोरी नगर परिषदचे नगराध्यक्ष पवनजी नारनवरे साहेब व मुख्याधिकारी सलामे मॅडम यांना निवेदनातून केली आहे.

         याप्रसंगी युवारंग वार्ड कमिटीचे सदस्य सुमित खेडकर, सूरज ठाकरे, देवेंद्र सोंकुसरे, महेश कांबळे, तुषार कांबळे, दीपक दुमाणे, नलेश खेडकर, गोलू नागपुरे, अक्षय खेडकर व वार्डातील नागरीक उपस्थित होते.