कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-पारशिवनी तालुक्यातील घाटरोहणा शेत शिवारात बिबट्याने जर्शी कालवडीचा गोठ्यात घुसुन फडशा पाडल्याची घटना बुधवारला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
गोडेगाव येथे राहणारे गोपाल गोविंद राऊत यांच्याकडे काही गाई व कालवड आहेत.पिडीत शेतकऱ्यांनी आपल्या गायी व कालवडी त्यांचा शेतातील गोठ्यात बांधले होते.
आज शेतमालक गोपाल राऊत हे ७ वाजताच्या सुमारास घाटरोहणा येथील शेतात गेले असता,तिथे बिबट्याने शेतातील कोठ्यात एका जर्शी कालवडचा फडशा पाडल्याचे दिसून आले…
शेतमालक यांनी घटनेची माहीती घाटरोहणा वा गोडेगावचे सरपंच,पोलिस पाटील यांना दिल्यावर त्यांनी घटनेची माहिती वनरक्षक वासनिक याना दिली. .
बिबट्याचा सदर परीसरात पाऊलखुणा आढळल्या.या घटनेची माहिती त्यांनी लगेच वनपरीक्षेत्र वन रक्षक वासनिक यांना दिली.त्यांनी घटनेची माहीती क्षेत्र सहायक अशोक दिग्रेसे यांना दिली.
घाटरोहणा गावात क्षेत्र सहायक अशोक दिग्रेसे,वनरक्षक वासनिक,वनमजुर आले व घटना स्थळाचा पंचनामा घटनेचा पंचनामा केला.
मृतक जर्शी कालवडमुळे पिडीत शेतकरी गोपाल गोविंद राऊत यांचे अंदाजीत १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.या परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा नेहमीच वावर असते.अश्या अनेक घटना येथे घटतच राहतात.
हल्लेखोर बिबट्याचे लवकरात लवकर बंदोबस्त करावा.तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी कालवड मालकाची आहे.
घाटरोहणा आणी गोडेगाव गावातील सरपंच,पोलिस पाटिल तसेच गावातील पुढारी,नागरिक यांनी पिडीत शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.