मिलिंद विद्यालय गौरखेडा (चांदई )येथे महात्मा गांधी यांची जयंती हुतात्मा दिन म्हणून साजरी… 

 युवराज डोंगरे/खल्लार 

            उपसंपादक

          नजिकच्या गौरखेडा(चांदई) येथील मिलिंद विद्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी महात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमितकुमार वानखडे होते.

            तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दिपक कावरे, वासुदेवराव भांडे ,कु मनिषा गावंडे उपस्थित होत्या .कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या फोटोच्या पूजनाने करण्यात आली.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग नववीचा विद्यार्थी लकी इंगळे याने केले.यावेळी उपस्थितांची समायोजित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक प्रशांत वानखडे यांनी केले.

           कार्यक्रमाला दिपक कावरे, प्रशांत वानखडे,वासुदेव भांडे ,मनिषा गावंडे, दिपक रहाटे, पूरणप्रकाशलव्हाळे, अमोल बोबडे, संजय आठवले ,आनंद खंडारे व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.