कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पारशिवनी तालुका कृ्षी विभागच्या कार्यालयाच्या सभा कक्षा मध्ये तालुका कृर्षी अधिकारी सुरज शेडें सह विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.
लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जनत करुन आणि मुक्त निःपक्षपाती शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म,वंश,जात समाज,भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी तालुका कृ्षी अधिकारी सुरज शेंडें,कृ्र्षी अधिकारी डहाट,कृषी पर्यवेक्षक झेलगोदें,वरिष्ठ लिपिक कुभांरे,कनिष्ठ लिपिक वाहणे,कृषीसहायक सोरमारे,कृ्षी प्रयवेक्षक तांत्रिक गायकवाड मँडम यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.