तिन राज्यात भाजपा तर एक राज्य काँग्रेसला… — मतगणना सुरूच.. — बसपा सुप्रिमो बहन मायावतींच्या बयानामुळे,”भाजपा तिन्ही राज्यात,परत सत्तेवर आली काय?

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका

               पाच राज्यातील मतगणना सुरू आहे.मात्र,मध्यप्रदेश,राजस्थान व छत्तीसगड राज्यात भाजपा सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या जवळ पोहोचली आहे तर तेलंगणा राज्यात काँग्रेसने सत्ता स्थापन करणारे बहुमत मिळवले आहे.

          राजस्थान व छत्तीसगड राज्यात काँग्रेसचे सरकार होते.या राज्यात भाजपाने काँग्रेसला पच्छाडत सरकार स्थापन करणारे बहुमत मिळवले आहे तर मध्यप्रदेश राज्यात भाजपाचे सरकार होते आणि तेथील मतदारांनी परत भाजपाला पसंती दिली असल्याचे दिसून आले आहे.

           तेलंगणा राज्यात मागील १० वर्षांपासून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा बिआरएस पक्ष सत्तेवर होता.या पक्षाला काँग्रेस पक्षाने मागे टाकत तेलंगणाची राज्य सत्ता हस्तगत केली आहे.

         मतमोजणी अजूनही सुरू असल्यामुळे कोणत्या पक्षाला किती मतदार संघात विजय मिळाला हे स्पष्ट झाले नाही.

              मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक पुर्व आदल्या दिवशी बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी ट्विटरवर ट्विट करीत म्हटले होते की,.‌.”चाहें भाजपा सत्तापर क्युव ना आए,बल्की काँग्रेस सत्तापर नहीं आणा चाहिए ।…या वाक्यातंर्गत विश्लेषणाचा भाग असला तरी सदर वाक्याचा मतदारांवर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला असावा असे राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीसगड राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालानंतर लक्षात येते आहे.