नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
भंडारा येथे दि. 23 जानेवारी 2023 ला आयोजित जिल्हास्तरीय मराठी भाषा संवर्धन स्पर्धेत कथालेखन मध्ये कु. वंशिका शरद उरकुडे (ईयत्ता सहावी, जिल्हा परिषद शाळा साकोली) हिने “भंडारा” जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळविला व शाळेचा गौरव वाढविला. सदर यशास तिचे आईवडील व शिक्षक वृंद यांनी आशीर्वाद देत पुढील यशास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.