श्री.गजानन विद्यालय आंबेनेरी भिसी येथील तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत प्रथम…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        चिमूर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२४-२५ स्पर्धेत माध्यमिक गटातून श्री गजानन विद्यालय आंबेनेरी ने प्रथम क्रमांक पटकवीला.माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजभे व इतर मान्यवर बक्षीस वितरण करीत असताना उपस्थित होते.

     प्राण्यांपासून शेतीची सुरक्षा या विषयाचे प्रयोगाचे नाव होते.मुख्याध्यापक बी.एम. गुरपूडे, शिक्षक एकनाथ थुटे व अनिल बेंडे सह विज्ञान शिक्षिका कु.विद्या डांगे व विद्यार्थी कु.वेदांती घोडमारेचे अभिनंदन केले.