दर्यापूर जहानपूर रोड अद्यापही हागणदारी मुक्त नाहीच… — हागणदारी मुक्तीचा केवळ गवगवा… — नाक दाबून करावा लागतो प्रवास…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

           महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक स्वरूपाच्या सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करून दिल्या आहेत. त्यामध्ये घरकुल ,रस्ते ,व शौचालय, याची सुद्धा निर्मिती अधिक प्रमाणात केली आहे. कागदपत्राची केवळ पूर्तता करून काही शौचालयाचा निधी सुद्धा गिळला गेला आहे. तर वस्तुस्थितीमध्ये शौचालय बांधल्यावर सुद्धा दर्यापूर शहरातील जहानपूर रोड लगत असलेल्या परिसरातील नागरिक अजूनही रस्त्याच्या कडेला शौचासाठी बसत आहेत.

          त्यामुळे येथील परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरल्या गेली,त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत या मार्गावर अधिक वाहतूक होत असल्याने नागरिकांना तोंडाला रुमाल बांधून व नाक दाबून प्रवास करावा लागतो.

          सदर मार्गावर बांधकाम विभागाचे कार्यालय ,शाळा, महाविद्यालय ,दवाखाने, व्यावसायिकांची प्रतिष्ठाणे ,व नागरी वसाहत सुद्धा आहे. तरीसुद्धा याला न जुमानता नागरिकांनी उघड्यावरच शौचालयास जाण्याला पसंतीक्रम दर्शवला आहे. सरकारच्या वतीने करोडो रुपयांची उलाढाल ही घरोघरी शौचालय बांधण्यासाठी व सुलभ शौचालयासाठी निधी उपलब्ध केला.परंतु याचा कुठेही फायदा होत असल्याचे दिसत नाही.

            तरी संबंधित विभागाने या महत्त्वपूर्ण व अतिगंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून जहानपूर रस्ता हागणदारी मुक्त करण्याचे येथील रहिवासी नागरिकांनी व शालेय विद्यार्थी व पालकांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केले आहे.