आम्हाला ( भारतीय जनतेला ) EVM आमदार, खासदार, केंद्र आणि राज्य सरकारने कितीही अन्याय आणि अत्याचार जाती / धर्माच्या नावानी केले, तरी आमच्यात एवढी सहनशक्ती आहे की, आम्हाला गळ्यापर्यंत जरी यांनी जमिनीत आम्हाला गाडलं. तरी आमचे नाक उघडेच आहे म्हणून आम्ही गर्वाने सांगत सुटणारे या व्यवस्थेचे गुलाम म्हणजे……..
“भारतीय जनता”
निर्लज्ज राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या तसेच भ्रष्ट आणि नितिभ्रष्ट प्रशासकीय सनदी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपकारावर तरलेल्या लोकशाहीचे मारेकरी आम्हीच आमच्या बापाच्या पोटी जन्मलेले षंढ आणि नपुसंक आणि वांझोटी लेकरं आहोत…….
आमच्या आजच्या नेभळट साहित्यिकांनी कधीच आक्रमक पवित्रा घेऊन या व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरून वैचारिक नेतृत्व न स्वीकारता बंद भिंतीतील हॉलमध्येच पुचकट शब्द फेकून लाखो रुपये पेन्शन असतांना हजारो रुपयाच्या मानधनासाठी आमची ही षंढ औलाद जन्मली नसती तर बरे झाले असते……..!
ज्या संघटना रस्त्यावर उतरतात, त्याच्या राष्ट्रीय अध्यक्षासोबत नातेवाईक धरून सोबत 15 च्यावर आकडा कधी जातच नाही……..
म्हणे आम्ही क्रांती करणार…..!
पाच वर्षातून एकदाच येणाऱ्या गल्ली ते दिल्लीच्या निवडणुकीसाठीच पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे उगवणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या संघटनांचा महापुर येतो आणि निवडणुकीत कोणत्यातरी झाडाखाली आर्थिक विसावा घेऊन पाच वर्षे रवंथ करत बसतो…….!
मोठे मोठे राजकीय पक्ष साम, दाम, दंड आणि भेदाच्या व काळ्या धनाच्या साहाय्याने या छत्र्यांचे बुड कापून सत्ता काबीज करुन लोकशाहीचे आम्हीच जीवनदाते असल्याचे ढोंग करुन……….
गरीब जनतेला
पुन्हा पाच वर्षे तोंड दाबून बुक्क्याचा मार द्यायला मोकळे……!
आता तर लाडक्या बहिणीला पाच वर्षें 90, 000/- रुपयात खरेदी करुन घेतल्यामुळे ती या व्यवस्थेच्या विरोधात एक शब्दही न बोलता दुसऱ्या निवडणुकीत त्यांनाच मत देण्यासाठी बिनादोरीचे बांधून टाकले आहे. म्हणजे आमच्या जीवाची किंमत आमच्या लाडक्या बहिणीने पाच वर्षासाठी ठरवून टाकली आहे ( जो मताचा अधिकार जिवापेक्षाही मोलाचा होता )……
उद्या जर मणिपूरच्या महिलांसारखी तुमची नग्न धिंड जर तुमच्या लाडक्या भावाने काढलीच तर तुम्ही तक्रार करायला नको म्हणून ही 1500/- रुपयाची व्यवस्था आहे……..
कारण आमचा देश, आमची लोकशाही, आमचे संविधान आणि आमची भारतीय जनता ही सर्व या संपूर्ण व्यवस्थेचे गुलाम झाले आहे………..
कारण…..
या आधुनिक EVM मनूने आमचा गळा घोटला आहे……..!
म्हणून आमचा 2024 चा देश आणि जनता मुका, बहिरा, लुळा आंधळा आणि पांगळा झाला…..
आम्ही आमच्या महापुरुषांच्या क्रांतीला मातीत गाडून हातात बांगड्या आणि गाऊन व साड्या घालून 1500/- रुपयाचे भिकारी होऊन नेत्यांच्या दारोदार जगण्याच्या धडपडीच्या स्पर्धेत मानसिक गुलामीच्या काळोखात प्रवेश करत आहोत…………
कारण……..
मराहुआ इन्सान ना ही बोलता हैं, ना ही सुनता हैं, ना ही देखता हैं, उसीको जिंदा गुलाम कहेते हैं…….!
जर तुमच्या रक्तात आपापल्या आदर्शाचा थेंब असेल……
जग ( नव्हे निदान देश ) बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भिमराव ” या अण्णाभाऊ साठे यांच्या संदेश समजून घ्या…….
अन्यथा गुलाम म्हणूनच जगा आणि गुलाम म्हणूनच शेवटी स्वतःच्या गळ्यात भावपूर्ण श्रद्धांजलीचा बेश्रमाच्या फुलांचा हार घालून घेऊन जग सोडून जा…….
येणाऱ्या भावी पिढीचे खुनी आणि गुन्हेगार व्हा……!!!
परंतू ( मी मात्र अनंत भवरे तसा होणार नाही )
कारण माझ्या बापाचे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) माझ्यावरील कर्ज त्यांच्या एका केसाएवढे जरी फेडू शकलो तरी मी स्वतःला धन्य समजेल…….
तुम्ही…………….
जागृतीचा कृतीशील लेखक आणि आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689