शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
वर्धा :- दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव प्रणित दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर, या संस्थेकडून पुरस्कार दिले जातात.
या वर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला “राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवाॅर्ड 2024” कर्नाटक , गोवा, महाराष्ट्र, तिनं राज्यातील संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
डॉ. विक्रम शिंगाडे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले की, पुरस्कारासाठी रिकबचंद पाटिल यांची निवड करण्याचे कारण असे की, ते मागील 22 वर्ष पासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले प्रकारचे मार्गदर्शन करुन वसतीगृहातील शैक्षणिक, सामाजिक या उद्दात हेतुने तसेच लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
त्यापैकी त्यांचे अतिशय मौलिक काम म्हणजे त्यांच्या वसतीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी कोणी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, कोणी शिक्षक, तर काही विद्यार्थी इतर पदांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांच्या या सेवेचा गौरव म्हणून त्यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
यशवंत नगर हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा येथे वास्तव्यास असलेले रिकबंचद शालीकराम पाटील सर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2024 देण्यात आला आहे.
रिकबंचद पाटील सर यांना आतापर्यंत राष्ट्रीय, राज्यस्तरीय, पातळीवर आता पर्यंत 6 पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पुर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना कडून, प्रा. प्रदीप लोहकरे, डॉ. प्रा. वाणी, सुनील फुलमाळी, उमेश पाटील, संजय गायकवाड, संजय धाबर्डे, घनश्याम जवादे, दिलीप गायमुखे, यांनी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
कोल्हापूर येथे आयोजित या कार्याक्रमाचे अध्यक्ष निपाणी विधानसभा मतदारसंघाचे प्रा. सुभाष श्रीधर जोशी आमदार साहेब होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते, लेखक हे होते.
श्री विकास पोळ चेअरमन, रविंद्र कुलकर्णी निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे, यल्लेश आ काळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डॉ. एस,अबवर बावा,एम डी बंगलोर, दगडू शिंदे निवृत्त उपजिल्हाधिकारी कागल डॉ. गुणवंत मंजू फिल्म डायरेक्टर बेंगलोर, प्रमुख पाहुणे सरोजनी पाटील जनरल सेक्रेटरी कोल्हापूर, डॉ. तुषार भोसले मॅनिजीग डायरेक्टर कागल, प्रा. डॉ, पांडुरंग पाटील सुवर्णपदक विजेता गडहिंग्लज यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसेस इंडिया शुभांगी शिंत्रे इचलकरंजी, आनंदहरी कुलकर्णी जेष्ठ साहित्यिक इस्लामपुर, डाॅ. दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वंशज सातारा कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकजा खटावकर अभिनेत्री सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.