शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- तालुक्यातील वडसी येथे आज ३० डिसेंबरला गावच्या पाण्याच्या टाकी जवळील झुडपात पाच वाजताच्या सुमारास अस्वलीने बस्तान मांडल्याने यांची माहिती वनविभागाला देताच वनविभागाचे कर्मचारी आणि वनमजूर घटना स्थळी उपस्थित राहुन अस्वलीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
सायंकाळी पाच वाजता सुमारास गावाजवळ अस्वल दिसल्याने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चक्क गावाजवळ अस्वल आल्याने युवकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि क्षेत्र सहाय्यक यांना माहीती देताच वडसी गावात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेरीचे क्षेत्र सहाय्यक रासेकर घटना स्थळी उपस्थित राहुन अस्वलीचा बंदोबस्त करण्यासाठी २५ वनमजूर आणि टायगर मानेट्री ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
रात्र झाल्याने झुडपात शोध घेणे कठीण झाले.घरवस्तीच्या दिशेने जाळ लाऊन कर्मचारी व वनमजूर रात्री उपस्थित राहतील अशी माहिती क्षेत्र सहाय्यक रासेकर यांनी पब्लिक पोस्ट प्रतिनिधी जवळ दिली.